Thu, Jul 18, 2019 02:06होमपेज › Satara › प्रवासी वाहनांना जीपीएस प्रणाली बंधनकारक 

प्रवासी वाहनांना जीपीएस प्रणाली बंधनकारक 

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 05 2018 10:51PMसातारा : प्रतिनिधी

प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांना जीपीएस आणि पॅनिक बटणाची सक्ती करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे साडे सहा हजार वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता  निर्माण झाली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 1 एप्रिलपासूनच अंमलबजावणी सुरू झाली आहे. संबंधीत यंत्रणा बसवल्यानंतर ते वाहन कोणत्या मार्गावर आहे, कोठे आहे? हे पोलिस यंत्रणेला लगेच समजणार आहे. 

प्रवासी वाहतूक करणार्‍या सर्वच वाहनांना जीपीएस आणि पॅनिक बटण बसवणे केंद्र शासनाने सक्तीचे केले आहे. याबाबत एक एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी  ही यंत्रणा बसविण्यात येत असल्याचे केंद्राने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. 

प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनात ही यंत्रणा बसवल्यावर, आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांने संबंधित पॅनिक बटण दाबल्यावर त्याची नोंद पोलिस किंवा महापालिकेकडे होणार आहे. त्यानंतर जीपीएससच्या माध्यमातून संबंधित वाहनांचा शोध घेवून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. शहरातील प्रवासी वाहतूक करणार्‍या सर्व वाहनांना जीपीएस व पॅनिक  बटण बसवणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी  वाहनधारकांना 7 ते 12 हजार रुपये खर्च येणार आहे. 

सरसकट  वाहनांना  बसवण्याबाबत स्थगिती दिली असली तरी 1 एप्रिल 2018 नंतरच्या वाहनांना जीपीएस व पॅनिक बटण बसवणे बंधनकारक आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यात 4 हजार  टॅक्सी व 2 हजार 500 बसेस आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 6 हजार 500 वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड बसण्याची  शक्यता निर्माण झाली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रवासी वाहतूक वाहनांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, तसेच इमर्जन्सी अलार्म बसवण्याच्या सूचना परिवहन विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे एक एप्रिलपासून या सुविधा नसलेल्या वाहनांचे पासिंग उपप्रादेशिक परिवहन विभागाने बंद केले आहे.

जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, तसेच इमर्जन्सी अलार्म बसविणे बंधनकारक आहे. त्याशिवाय प्रवाशी वाहनांचे पासिंग करता येणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनधारकांनी ती यंत्रणा बसवावी. ही यंत्रणा बसविण्याची सुविधा सातार्‍यात सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले.

 

Tags : satara, satara news, passenger vehicles, GPS system,