होमपेज › Satara › ग्रा.पं. निवडणूक : सदस्यपदाचे ६ अर्ज बाद

ग्रा.पं. निवडणूक : सदस्यपदाचे ६ अर्ज बाद

Published On: Dec 13 2017 2:04AM | Last Updated: Dec 12 2017 10:33PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 14  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 214 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सरपंचपदासाठी  44  तर  सदस्यपदासाठी 170 जणांनी उमेदवारी दाखल केल्या. दरम्यान, मंगळवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत सरपंचपदाचे सर्व अर्ज वैध ठरले असून सदस्यपदाचे 6 अर्ज बाद झाले.  दि. 14 रोजी माघार प्रक्रिया राबवली जाणार आहे.
जानेवारी ते फेब्रुवारी 2018 या दरम्यान मुदत संपणार्‍या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार 14 ग्रामपचायतींची निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे.  शेवटच्या दिवशी तब्बल 101 उमेदवारी अर्ज दखल झाले होते. जावळी तालुक्यातील आनेवाडी व नांदगणे ग्रामपंचायतींसाठी 38, कोरेगाव तालुक्यातील चवणेश्‍वर ग्रामपंचायतीसाठी 11, महाबळेश्‍वर तालुक्यातील एरंडल, कमळगाव या ग्रामपंचायतींसाठी 18, माण तालुक्यातील जाधववाडी ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी 4 तर सदस्यपदासाठी 19 असे एकूण 23 उमेदवारी अर्ज दाखल झाले. खटाव तालुक्यातील नलवडेवाडी, कामथी तर्फ परळी या ग्रामपंचातींसाठी 20 तर फलटण तालुक्यातील उपळवे, सावंतवाडी, दर्‍याचीवाडी, जाधवनगर या ग्रामपंचायतींसाठी 89 असे जिल्ह्यातून एकूण 214 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दि. 12 रोजी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सरपंचपदाचे सर्व अर्ज वैध ठरले. तर जावली 1, महाबळेश्‍वर 3, खटाव 2 असे 6 जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. दरम्यान, या निवडणुकीसाठी दि. 14 रोजी माघार प्रक्रिया  दुपारी 3 पर्यंत रावबली जाणार आहे. त्यानंतर  उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केल्यावर चिन्ह वाटप केले जाणार आहे.

चवणेश्‍वरचे सरपंचपद रिक्त

चवणेश्‍वर (ता. कोरेगाव) या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचदासाठी शेवटच्या दिवसापर्यंत एकानेही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे चवणेश्‍वरचे सरपंचपद रिक्त राहिले आहे.