Thu, Jun 27, 2019 01:58होमपेज › Satara › कॉलेज मौजमस्ती उठलीय विद्यार्थ्यांच्या जीवावर

कॉलेज मौजमस्ती उठलीय विद्यार्थ्यांच्या जीवावर

Published On: Mar 17 2018 1:13AM | Last Updated: Mar 16 2018 8:35PMलिंब : प्रवीण राऊत 

आजची स्मार्ट तरुणाई शाळा, महाविद्यालयांकडे दुर्लक्ष करत मौजमजा करण्यात गुंतली आहे. विद्यार्थ्यांची ही मौजमजा त्यांच्या करिअरचे तर मात्रे करतेच त्याचबरोबर अतिउत्साहाच्या नादात त्यांचे प्राणही घालवते. विद्यार्थ्यांच्या मौजमस्तीबाबत पालकांसह, महाविद्यालय प्रशासनही अंधारात असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढे काय वाढून ठेवले आहे, याची कसलीही कल्पना राहत नाही. नुकताच पॉलिटेक्निकच्या एका विद्यार्थिनीला मैत्रिणीचा वाढदिवस तिच्या जीवावर बेतला. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याची गरज आता व्यक्‍त होऊ लागली आहे.

खरं तर शालेय जीवनातून बाहेर पडल्यानंतर विद्यार्थी हे कॉलेजच्या विश्‍वात हरवतात. शाळेत असणारी शिस्त कॉलेजमध्ये विसरतात. काही बहाद्दर तर पालकांना बाईकसाठी आग्रह करतात. पालकही विद्यार्थ्यांच्या हट्टापुढे नमते घेत त्यांना  बाईकबरोबर प्रत्येक इच्छा अभ्यास करण्याच्या अटीवर घेऊन देतात.

मात्र, बरेचसे विद्यार्थी पालकांना अंधारात ठेऊन कॉलेजला मौजमस्ती करण्यासाठी जातात. कॉलेजचा प्रत्येक क्षण एन्जॉय कसा करता येईल याकडे हे विद्यार्थी आपले लक्ष अधिक केंद्रीत करतात. मित्र—मैत्रिणीचा वाढदिवस, वार्षिक स्नेहसंमेलन, सहल, सण  या गोष्टी  सेलिब्रेशन करताना विद्यार्थ्यांना कशाचीच अट राहत नाही. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकाराची पालकांना मात्र पुसटशीही कल्पना नसते.

आजच्या स्मार्ट विद्यार्थ्यांना मोबाईलचेही प्रचंड वेड लागले आहे. दिवसभर ते मोबाईलवर डोकं घालून बसतातच त्याचबरोबर फिरायला गेल्यावर जीवघेणी कसरत करत तरुणाई सेल्फीच्या मोहात पडत असतात. कुठे कठड्यावर तर कुठे धबधब्याच्या काठावर तर कुठे रेल्वे ट्रॅकवर कधी जातील आणि कसा सेल्फी घेतील याचा नेम नाही. या सेल्फीच्या नादात आजअखेर अनेकांचा जीवही गेला आहे.

अलिकडे रंगपंचमी साजरी करण्यासाठी तरुणाईची फौज कास पठारावर गेली होती. रंगपंचमीच्या उत्साहात परत येत असताना झालेल्या अपघातात तरुणासह, एक मुलगीही गंभीर जखमी झाली होती आणि त्यातच बुधवारी लिंब येथे झालेल्या अपघातात  एका युवतीला आपले प्राण गमवावे लागले. खरं तर आपली मुले महाविद्यालयात  शिकत आहेत, या संभ्रमात मुलांनी पालकांपुढे काय वाढून ठेवले आहे, याची साधी कल्पना नसते.  विद्याथ्यार्ंनी आपले आई—वडील करत असलेल्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे. 

मौजमस्तीच्या नादात आपण स्वत:बरोबर पालकांचेही नुकसान करत असल्याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. कॉलेज प्रशासनानेही याबाबत लक्ष दिले पाहिजे तरच अशा गंभीर प्रकारांना आळा बसेल.

‘पिकनिक स्पॉट’च असतात हुल्‍लडबाजीची ठिकाणे

कॉलेजच्या नावाखाली कॉलेज युवक—युवती फिरायला जाण्यावर अधिक भर देतात. विशेष म्हणजे सेलिब्रेशनची निवडलेली जागा नामी  असते. विद्यार्थ्यांचे सेलिब्रेशनचे स्पॉट म्हणजे डोंगर कपारी नाहीतर नदीनाले किंवा धरणाची, जंगलाची ठिकाणे. खरं तर ही ठिकाणे  तशी धोकादायकच. अनेक हुल्‍लडबाज या ठिकाणी येऊन धिंगाणा घालत असतात. पिकनिक स्पॉटच हुल्लडबाजीची ठिकाणे बनली आहेत.

Tags : Satara, Satara News, College, Youth, College Youths, Ignoring Colleges,