होमपेज › Satara › सातारा : विम्याचे पैसे मिळवून देतो म्हणून एकाची फसवणूक 

सातारा : विम्याचे पैसे मिळवून देतो म्हणून एकाची फसवणूक 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

युवतीचा मृत्यू झाल्यानंतर 2 लाख 30 हजार रुपये बोरगाव पोलिसांकडून मिळवून देतो असे सांगून पंकज मोहन यादव रा. सासपडे ता. सातारा याच्याविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बाळू व्यंकट लोहार यांनी तक्रार दिली आहे. 

दरम्यान, तक्रारदाराची मुलगी स्नेहल हिला चक्कर आल्याने तिचा मृत्यू झाला होता. मुलीच्या आकस्मिक मृत्यूसाठी बोरगाव पोलिसांना सांगून 2 लाख 30 हजार रुपयांचा चेक मिळेल असे संशयीताने सांगितले होते. तसेच या प्रक्रियेसाठी पंकज यादव याने वेळोवेळी तक्रारदार यांच्याकडून 60 हजार रुपये घेतले आहेत.

 

Tags : Froud,Insurence,Issue,Police, Crime,Satara, Dead 


  •