Mon, Apr 22, 2019 03:57होमपेज › Satara › भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ खंडाळ्यात मोर्चा

भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ खंडाळ्यात मोर्चा

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 10:31PM

बुकमार्क करा
खंडाळा : वार्ताहर 

संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर केलेले आरोप मागे घ्यावेत, भीमा कोरेगाव प्रकरणाची निःपक्ष चौकशी होऊन खर्‍या आरोपींना तातडीने अटक करावी. या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रतिष्ठान खंडाळा तालुक्याच्या वतीने शेकडो धारकर्‍यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले.

पारगांव येथील भीमाशंकर मंदिरापासून खंडाळ्यातील मुख्य मार्गावरून तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्‍यांनी भिडे गुरुजींविरोधात कटकारस्थाने  करून त्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाही. भिमा कोरेगांव प्रकरणात दंगल घडवणार्‍या खर्‍या सूत्रधारांना अटक करावी. भिडे गुरुजीं यांनी देव, देश आणि धर्मरक्षणासाठी तरुणांच्या मनात जागृती निर्माण केली आहे.

गडकोट मोहीम, दुर्गा दौड यासारखे देशभक्तीपर कार्यक्रम त्यांच्याकडून राबवले जात आहेत. शिवरायांच्या विचारांचा वारसा तरूणांमध्ये जोपासला जावा. यासाठी ते काम करत आहेत. भीमा कोरेगांव प्रकरणाशी त्यांचा काहीच संबंध नाही, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोनि भाऊसो पाटील,  सपोनि युवराज हांडे यांनी बंदोबस्त ठेवला होता .