Fri, Aug 23, 2019 21:07होमपेज › Satara › सामुदायिक विवाह सोहळ्यातील  जोडप्यांना महावस्त्राचे वितरण

सामुदायिक विवाह सोहळ्यातील  जोडप्यांना महावस्त्राचे वितरण

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 8:15PMसातारा : प्रतिनिधी

धर्मादाय आयुक्‍त महाराष्ट्र राज्य, मुंबई शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून तसेच आय. के. सुर्यवंशी व सौ.पी.आय.सुर्यवंशी सहाय्यक धर्मादाय आयुक्‍त सातारा व सातारा जिल्हा धर्मादाय संस्था सामुहिक विवाह सोहळा समिती आणि सहाय्यक धर्मादाय आयुक्‍त कार्यालय अ‍ॅडव्होकेटस् बार असोसिएशन सातारा यांच्या माध्यमातून आयोजित विनामूल्य सामुदायिक विवाह सोहळा सातारा येथील कला वाणिज्य महाविद्यालय कोटेश्‍वर मैदानासमोर शुक्रवार दि.11 मे 2018 रोजी होणार आहे.

समितीच्या माध्यमातून सातारा जिल्हयामध्ये दि. 11 मे 2018 रोजी सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 6 मे 2018 रोजी  मौजे आदर्की ता. फलटण येथे श्री भैरवनाथ मल्टी स्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी व कोयना सोळशी कांदाटी सामाजिक विकास संस्था, सातारा जिल्हा धर्मादाय संस्था सामुहिक विवाह सोहळा समिती,सातारा यांच्या संयुक्‍त विद्यमाने विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. फलटण येथे 15 व तळदेव येथे 6 जोडप्यांचे विवाह लावण्यात येणार असून सातारा येथे आजपर्यंत 8 जणांची नोंद करण्यात आलेली आहे. 30 एप्रिल 2018 ही नोंद करण्याची अंतिम तारीख असून साधारण 15 ते 20 विवाहांची नोंद होईल.

या सोहळ्यास जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे समितीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी सांगितले. दरम्यान नोंदणी पूर्ण करण्यात आलेल्या जोडप्यांना महावस्त्राचेे वितरण  सहाय्यक धर्मादाय आयुक्‍त आय. के. सुर्यवंशी व सौ. पी. आय. सुर्यवंशी, समितीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते करण्यात आले. समितीच्या वतीने सर्वप्रकारच्या सोयी करण्यात आल्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा पडणार नसून आमच्या मुलांचे विवाह आम्ही केलेल्या अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने मोठ्या दिमाखात पार पडणार असून मुला-मुलींच्या विवाहासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ आमच्यावर येणार नाही, असे काही पालकांनी बोलून दाखविले. याप्रसंगी समितीचे सचिव अ‍ॅड. सचिन तिरोडकर, खजिनदार सौ. सीमा जाधव, अ‍ॅड. जोया शेख, अ‍ॅड. सकटे, अ‍ॅड. म्हस्के, समितीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

 

Tags : satara, satara news, community wedding, ceremony,