Tue, Feb 19, 2019 12:07होमपेज › Satara › विम्याची रक्‍कम देतो सांगून फसवणूक

विम्याची रक्‍कम देतो सांगून फसवणूक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

युवतीचा आकस्मित मृत्यू झाल्यानंतर तिच्या मृत्यूबद्दल विमा कंपनीद्वारे 2 लाख 30 हजार रुपये मिळवून देतो, असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी पंकज मोहन यादव (वय 26, रा. सासपडे, ता. सातारा) या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बोरगाव पोलिसांकडून ही मदत मिळवून देत असल्याचे संशयिताने म्हटले आहे.

बाळू व्यंकट लोहार (रा. सासपडे) यांनी याबाबतची तक्रार बोरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांना स्नेहल नावाची मुलगी होती. जानेवारी महिन्यात स्नेहलला चक्‍कर आल्याने तिचा मृत्यू झाला होता. यावेळी पंकज यादव हा युवक त्यांना भेटला व स्नेहलचा आकस्मित मृत्यू झाल्याने त्याबदल्यात 2 लाख 30 हजार रुपयांचा चेक (धनादेश) मिळवून देतो, असे सांगितले.

संशयित पंकज यादव याने चेक मिळण्यासाठी बोरगाव पोलिसांना सांगून तेथील सर्व प्रक्रिया पार पाडून देतो असेही तक्रारदार यांना सांगितले. लोहार कुटुंबियांनीही पंकज बोलतोय त्याच्यावर विश्‍वास ठेवला. यासाठी संशयित पंकज याने वेळोवेळी तक्रारदार यांच्याकडून 58 हजार रुपये घेतले. संशयिताने चेक मिळण्यासाठी बँकेत खाते काढायला लावून तसेच दरम्यानच्या काळात चेक मिळाला असल्याचे सांगून त्याने बँकेत प्रक्रिया केली असल्याचे खोटी कागदपत्रेही दाखवली. मात्र गेल्या काही दिवसांपासून संशयित पंकज हा तक्रारदार यांना भेटण्यास टाळाटाळ करत होता. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच तक्रारदार यांनी बोरगाव  पोलिस ठाण्यात जावून घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, संशयित पंकज याच्याविरुध्द यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

Tags : Satara, Satara  News, Fraud, telling, sum ,insured 


  •