Fri, Apr 26, 2019 17:37होमपेज › Satara › भरतीचे आमिष दाखवून फसवणूक; एकावर गुन्हा

भरतीचे आमिष दाखवून फसवणूक; एकावर गुन्हा

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 10:51PMकोरेगाव : प्रतिनिधी

लष्करात नोकरी लावतो असे सांगून बोरजाईवाडी, ता. कोरेगाव येथील युवकाची 2 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजकुमार बजरंग काटकर (वय 48, रा. कुकुडवाड, ता. माण) याच्यावर कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बोरजाईवाडी येथील राजेंद्र हरिश्‍चंद्र कदम (वय 48) यांना आपला मुलगा निरंजन याला सैन्यात भरती करायचे होते. ही बाब त्याचे चुलते किशोर रामचंद्र कदम यांना माहित होती. त्यांनी निरंजन याला राजकुमार काटकर याची दहिवडी येथे महाराष्ट्र करिअर अकादमी आहे. ते आपल्या चांगल्या परिचयाचे असून ते पैसे घेऊन भरती करतील असे सांगितले. याबाबत निरंजन व त्याच्या नातेवाईकांनी काटकर व निता डांबे यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी काटकर याने भरतीसाठी 4 लाख रूपये लागतील, असे सांगितले होते. यासाठी सुरूवातीला 2 लाख आणि भरती झाल्यानंतर 2 लाख असा व्यवहार ठरला होता. त्यानुसार निरंजन याने काटकर डोंबे यांच्याकडे 2 लाख रूपये दिले. 

त्यानंतर निरंजन याला काटकर व डोंबे यांनी सिकंदराबाद (तेलंगणा)येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी अण्णा नावाच्या इसमाची ओळख करून दिली. 15 दिवसांमध्ये कॉल लेटर येईल, असे काटकर याने निरंजन याला सांगितले होते. मात्र, आजअखेर भरतीबाबत कोणतेही लेटर न आल्याने काटकर याच्याकडे विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली. निरंजन याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने काटकर याच्या विरोधात कोरेगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

 

Tags : satara, Koregaon news, crime, recruitment, Fraud,