Wed, Jul 17, 2019 20:04होमपेज › Satara › कार दरीत कोसळल्याने चौघे जखमी

कार दरीत कोसळल्याने चौघे जखमी

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:41PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी

आलेवाडीच्या दिशेने जात असताना शनिवारी सकाळी 11 वाजता बलेनो कार मेढा, कुडाळ घाटात दरीत कोसळल्याने 4 प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी सकाळी बलेनो क्रमांक एम. एच 11. बीव्ही 6204 ही पाचवड येथील आलेवाडीच्या दिशेने जात होते. यावेळी  गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने गाडी कुडाळ घाटात 400 फूट दरीत कोसळली.

हा अपघात झाल्यानंतर शेतामध्ये काम करणार्‍या शेतकर्‍यांनी कारमधील चौघांना बाहेर काढले. सर्व प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर तात्काळ या जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली आहे.