Wed, Nov 21, 2018 06:12



होमपेज › Satara › पाटण : जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांकडून अधिकाऱ्याला मारहाण

पाटण : जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांकडून अधिकाऱ्याच्या कानशिलात video

Published On: Aug 30 2018 3:31PM | Last Updated: Aug 30 2018 3:39PM



मारूल हवेली : वार्ताहर

कृषी विभागाने घेतलेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. मल्हारपेठ येथील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमावेळी आज (गुरूवार) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अंगावर जाण्याचे हे प्रकार काही केल्या कमी होताना दिसत नाही आहेत.

याबाबत माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून पाटण तालुक्यात पावसाचा वाढता जोर असल्याने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विक्रमबाबा पाटणकर करत होते. मल्हारपेठ येथे कृषी विभागाच्यावतीने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात विक्रमबाबा पाटणकर यांचा तालुक्यातील एका तालुका कृषी अधिकारी प्रविण आवटी यांच्याशी वादवादी झाली. यातून पाटणकर यांनी हा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आवटी यांनी त्यांना विरोध केला असता पाटणकर यांनी कृषी अधिकारी आवटी यांच्या कानशिलात लगवाली. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. 

या प्रकारानंतर विक्रमबाबा पाटणकर यांच्या विरोधात मल्हारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान कृषी विभागाने या घटनेचा निषेध नोंदवला आहे.