Thu, Nov 15, 2018 11:42होमपेज › Satara › कंटेनर-फोर्ड कारचा अपघात;तिघे जखमी (Video)

कंटेनर-फोर्ड कारचा अपघात;तिघे जखमी (video)

Published On: Apr 15 2018 12:43PM | Last Updated: Apr 15 2018 12:48PMउंब्रज : प्रतिनिधी

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शिवडे फाटा येथे फोर्ड कार आणि कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात कोल्हापूरचे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. 

कराडकडे जाणारी फोर्ड कार क्रं. एमएच-बीएम- ३९९९ ही महामार्गाच्या कडेला उभा असलेला कंटेनर क्रं. एम एच - ०४ - जीआर-३५३९ वर पाठीमागून जोरदार आदळल्याने कार मधील तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका महिलेचा समावेश आहे.  

सर्व जखमी कोल्हापूर येथील असल्याचे समजते. घटनास्थळी महामार्ग पोलिस व महामार्ग देखभाल चे कर्मचारी तसेच उंब्रज पोलिसांनी तातडीने धाव घेऊन जखमींना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रूग्णालयात दाखल केले आहे. 
 

Tags : Accident, Ford Car, Contener