Wed, Apr 24, 2019 11:28होमपेज › Satara › आरक्षण व सनातनवरील बंदीसाठी एमआयएमचे कराडात धरणे (Video)

आरक्षण व सनातनवरील बंदीसाठी एमआयएमचे कराडात धरणे (Video)

Published On: Aug 28 2018 6:02PM | Last Updated: Aug 28 2018 6:02PMकराड : प्रतिनिधी

मुस्लिम समाजाला सरकारने दिलेले पाच टक्के आरक्षण कायम करण्यात येऊन त्याची अंमलबजाणी करावी तसेच सनातन या देशद्रोही संघटनेवर बंदी घालावी यासह  अन्य मागण्यांसाठी एमआयएम पक्षाच्यावतीने कराड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू आहेत हे तात्काळ रोखावेत. मुस्लिम पर्सनल कायद्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांच्या नेतृवाखाली हे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजेंद्र शेळके यांना देण्यात आले . यावेळी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड उपस्थित होते.