Tue, Apr 23, 2019 01:36होमपेज › Satara › शिक्षण समितीच्या सभेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर

शिक्षण समितीच्या सभेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर

Published On: Dec 23 2017 2:12AM | Last Updated: Dec 22 2017 11:31PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळण्यासाठी  जास्तीत जास्त शाळा डिजिटल करण्याचा निर्णय शिक्षण व क्रीडा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

शिक्षण व क्रीडा समितीची सभा शिक्षण सभापती राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सभेस शिवाजी चव्हाण, अरूण गोरे, विजय पवार, प्रदिप पाटील, भावना सोनवलकर, वनिता पलंगे, रूपाली राजपुरे, शंकर देवरे, नवनाथ भरगुडे, रूपेश जाधव, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास कुलाळ, उपशिक्षणाधिकारी एच.व्ही. जाधव, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न, थिंक टँकच्या माध्यमातून गणित सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रतापसिंह हायस्कूलसह, प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. 

दरम्यान, अर्थ समितीची सभा राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेस मानसिंगराव जगदाळे, मनोज घोरपडे,  रेश्मा भोसले, अरूणा शिर्के, संदिप मांडवे, भारती पोळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वि.तु. पाटील  व अधिकारी उपस्थित होते.

सभेत जिल्हा परिषदेचे सर्व कामकाज संगणकीकृत करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व विभागाचे कामकाज करण्यात येणार आहे. यासाठी फेब्रुवारीमध्ये  चाचणी घेवून मार्चमध्ये सर्व कामकाज संगणकीकृत करण्यात येणार आहे. त्यामुळे  सर्व विभागातील कामकाजाची बिले अर्थ विभागात आल्यानंतर बिलाला विलंब न लागता संबंधित ठेकेदाराच्या बँक खात्यात कामाचे पैसे आरटीजीएसने वर्ग करण्यात येणार असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले.

सातारा जिल्हा परिषदेमधील प्रिटींग प्रेसमध्ये नव्याने फोर कलर प्रिटींग मशीन घेण्याबाबतचा निर्णय घेवून ती मार्चमध्ये कार्यान्वित करण्याबाबत  चर्चा करण्यात आली. या नवीन मशीनमुळे जिल्हा परिषदेच्या सर्व विभागासह शासकीय कार्यालयाची कामे झेडपीच्या प्रेसला मिळणार आहेत त्यातून आर्थिक उत्पन्नही मिळण्यास मदत होणार असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले.