Sun, Feb 17, 2019 03:39होमपेज › Satara › वाई: धोम धरण भरले; कृष्णा नदीला पूर video

वाई: धोम धरण भरले; कृष्णा नदीला पूर video

Published On: Aug 17 2018 2:18PM | Last Updated: Aug 17 2018 4:07PMवाई : प्रतिनिधी

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात काही दिवसापासुन जोरदार पाऊस असल्याने धोम धरण ९६ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने गुरुवारी रात्री २ हजार क्युसेक्सने नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदी पात्रा शेजारील गावाना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

बलकवडी धरण पुर्ण क्षमतेने भरले असल्याने त्यातून धोम धरणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. डोंगरातून पाणी मोठया प्रमाणात ओढे नाल्यात येत असल्याने नदी पाणी पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे रात्री सात वाजता धोम धरणाचे दरवाजे उघडण्यात  आले. तीन दरवाजे एक फुटाने तर दोन दरवाजे दिड फुटाने उघडण्यात आले आहेत. सध्या पाच हजार क्युसेक्स पाणी विसर्ग सुरु असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे . धरणात ६४०० क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धोम धरण साडेतेरा टीएमसी असून सध्या १३ .०३ टीएमसी पाणीसाठा आहे . मागील वर्षी या दिवशी १०.०७ टीएमसी इतका पाणीसाठा होता. या मोसमातील पहिला महापुर असल्याने अनेकांनी महापुरात पोहण्याचा आनंद लुटला.