Wed, Nov 14, 2018 23:16होमपेज › Satara › सातारा, म्हसवडमधील पाच मटका किंग तडीपार

सातारा, म्हसवडमधील पाच मटका किंग तडीपार

Published On: Mar 07 2018 11:27PM | Last Updated: Mar 07 2018 11:17PMसातारा : प्रतिनिधी

जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांचा मटका किंग बहाद्दरांवर कारवाईचा तडाखा सुरूच असून बुधवारी म्हसवड व सातारा तालुक्यांतील पाच मटका किंग सहा महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. 

बाळासो रामचंद्र पानसांडे व बाळू भानुदास ढोबळे (दोघेही रा. म्हसवड, ता. माण) तसेच विशाल शांताराम बेबले (वय 27, रा. रामनगर), दत्तात्रय रामचंद्र इंगवले (वय 45, रा. सैदापूर) व नितीन बाजीराव हिरवे (वय 32, रा. वर्ये, ता. सातारा) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, संशयित पाच जण म्हसवड व सातारा तालुका  पोलिस ठाणे हद्दीत बेकायदेशीररित्या जुगार व मटक्याचा व्यवसाय करत होते.

संशयितांवर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अनेकदा गुन्हेे दाखल झाले आहे. अटकेसारखी कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा होत नव्हती.  त्यामुळे स्थानिक पोलिसांनी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप यांच्याकडे तडीपारीचे प्रस्ताव पाठवले होते. या प्रस्तावांची पडताळणी केल्यानंतर हे पाच मटका किंग तडीपार केले आहेत.