Tue, Mar 19, 2019 03:27होमपेज › Satara › सातारच्या युवकाचा आयआयटीत झेंडा

सातारच्या युवकाचा आयआयटीत झेंडा

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 06 2018 10:27PMसातारा : प्रतिनिधी 

सातार्‍याच्या ऋषी संजय कोरडे यांना नुकतेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वाराणसी येथे इंटिग्रेटेड एम.टेक.मध्ये प्रथम क्रमांकाने व विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याने सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. केमिकल इंजिनिअरिंगमधील विशेष शाखा असलेल्या इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये पाच वर्षांतील आठ सेमिस्टरमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. सातारच्या युवकाने आयआयटीमध्ये झेंडा फडकावत सुवर्णपदक पटकावल्याने जिल्ह्याची मान उंचावली आहे. 

ऋषी कोरडे यांनी पदवी अभ्यासक्रम चालू असतानाच संशोधनाचा कार्यक्रम चालू ठेवला व त्या काळात तीन संशोधनात्मक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले. या काळात आयआयटीमध्ये प्रोफेसर एम. ए. कुरेशी व प्रोफेसर जयकुमार कँडासामी यांचे मार्गदर्शन लाभले. 

जर्मनी येथे सारलँड विद्यापीठात प्रोफेसर डॉक्टर मायकेल स्प्रिंगबोर्ग यांच्या ग्रुपमध्ये संशोधनाचे कार्य करण्याची संधी कोरडे यांना मिळाली व तेथील कॉम्प्युटेशनल केमिस्ट्रीचे तंत्रज्ञान आपल्या आयआयटीत आणण्याचे कार्य त्यांनी केले. इंग्लंडमध्ये मँचेस्टर युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर डॉक्टर इगोरलारोसा यांच्या ग्रुपमध्ये ऑरगॅनिक सिंथेसिस (जीसरपळल डूपींहशीळी) वर किचकट संशोधन केले आहे. त्यावरील शोधनिबंध आंतरराष्ट्रीय प्रख्यात नियतकालिकांमध्ये प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांची निवड इंग्लंड येथील प्रतिष्ठित इम्पिरियल कॉलेज लंडन बिझनेस स्कूल येथे झाली आहे. 1 सप्टेंबरपासून ते तेथे रुजू होत आहेत. 

ऋषी यांनी भविष्यामध्ये उच्च शिक्षण पूर्ण करून आणि उद्योजकतेमध्ये विशेष अनुभव घेऊन पुन्हा देशाच्या प्रगतीसाठी भारतामध्ये कार्य करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. ऋषी कोरडे हे सातार्‍यातील प्रख्यात ह्रदयरोग तज्ञ डॉ. संजय कोरडे व आई डॉ. भारती कोरडे यांचे चिरंजीव आहेत.