Mon, Aug 19, 2019 04:54होमपेज › Satara › सातार्‍यात पहिले मराठी हास्य साहित्य संमेलन

सातार्‍यात पहिले मराठी हास्य साहित्य संमेलन

Published On: Jun 02 2018 2:04AM | Last Updated: Jun 01 2018 10:58PMसातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले मराठी हास्य साहित्य संमेलन शुक्रवार दि. 8 जून रोजी समर्थ सदन सातारा येथे होणार असल्याची माहिती संमेलनाचे अध्यक्ष बंडा जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बंडा जोशी म्हणाले, शुक्रवार दि. 8 रोजी सायंकाळी 4 वाजता संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक व प्रसारमाध्यम तज्ञ डॉ. विश्‍वास मेहंदळे यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. स्वागताध्यक्ष सातारा विकास आघाडीचे सचिव अ‍ॅड. दत्तात्रय बनकर आहेत. सायंकाळी 5.30 वाजता हास्यकवी संमेलनाचे आयोजन केले असून पुणे, माजलगाव, नागपूर, अहमदनगर येथील कवी सहभागी होणार असून अध्यक्षस्थानी अ भा म सा महामंडळाचे प्रतिनिधी विनोद कुलकर्णी  आहेत.

संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी शनिवार दि. 9 जून रोजी सकाळी 10.30 वाजता एकपात्री संमेलनाचे आयोजन केले असून यामध्ये रामनगरी, हासवेगिरी, हास्ययात्रा आणि हास्यपंचमी हे एकपात्री प्रयोग सादर होणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पत्रकार रविंद्र बेडकिहाळ भूषविणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता समारोपाच्या सत्रात विनोदी कथाकथन होणार आहे. यामध्ये बारामती, शिराळा, वाळवा, पुणे, सातारा येथील हास्यलेखक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.यावेळी श्रीकांत देवधर, अभय देवरे, श्याम बदके, विनायक भोसले उपस्थित होते.