Sun, Nov 17, 2019 12:48होमपेज › Satara › नायब तहसीलदारांच्या घराला आग   

नायब तहसीलदारांच्या घराला आग   

Published On: Jul 12 2019 2:30PM | Last Updated: Jul 12 2019 1:45PM
महाबळेश्वर : वार्ताहर

नायब तहसीलदार श्रीकांत तिडके यांच्या निवासस्थानास शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. सुदैवाने शेजाऱ्यांनी समयसूचकता दाखवून दार तोडून तिडके दांपत्याला बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. दरम्यान पालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी हानी टळली.

यानंतर तिडके दांपत्याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले . या आगीत मोठ्या प्रमाणात संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले.