Thu, Apr 25, 2019 18:40होमपेज › Satara › आहिरमुरा येथे दोन घरे जळून खाक; दोन जण जखमी

आहिरमुरा येथे दोन घरे जळून खाक; दोन जण जखमी

Published On: Apr 27 2018 1:09AM | Last Updated: Apr 26 2018 10:40PMबामणोली/महाबळेश्‍वर : वार्ताहर

महाबळेश्‍वर तालुक्यातील आहिर मुरा येथे लागलेल्या आगीत दोन घरे खाक झाली असून दोन जनावरे मृत्यूमुखी पडली. जनावरांचा चाराही जळून खाक झाला आहे. या घटनेत दोघे जखमी झाले आहेत. वणव्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.  

महाबळेश्‍वरपासून 32 किलोमीटर अंतरावर डोंगरावर आहिरमुरा हे गाव आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास या गावच्या परिसरात वणवा लागला होता. तो भडकत जाऊन आग फैलावली. त्यामध्ये भगवान गंगाराम काळे व लक्ष्मण कोंडिबा ढेबे यांची घरे जळून खाक झाली. जानाबाई राघू ढेबे (वय 70), मानाजी ठकू काळे (वय 75) हे जखमी झाले आहेत. जानाबाई यांच्यावर सातार्‍यात सिव्हिलमध्ये तर मानाजी यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत.

गंजीची आग आटोक्यात आणण्यासाठी गेल्या असता आजीबाई भाजल्या. तसेच या घटनेत दोन जनावरे देखील मृत झाली. संसारोपयोगी साहित्यासह लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, महाबळेश्वर तहसील कार्यालयातील अधिकारी तलाठी यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.