Mon, Jun 17, 2019 02:16होमपेज › Satara › शिरवळ येथे बेकरीला आग

शिरवळ येथे बेकरीला आग

Published On: Apr 16 2018 7:14PM | Last Updated: Apr 16 2018 7:14PMखंडाळा : वार्ताहर 

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील तोडकरी बेकरीला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे 15 लाखाचे नुकसान झाले.

याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील शिरवळ विश्रामगृहानजीक मुख्य रस्त्याच्याकडेला असणाऱ्या तोडकरी बेकरीस सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. दरम्यान शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण करताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.घटनेचे गांभीर्य ओळखून आगीची झळ इतरांना बसु नये यासाठी एशियन पेंटसचे अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले होते.

एशियन पेंटसचे सुरक्षापथकाचे प्रमुख दिग्वीजय भोसले ,आणि अग्नीशमन दलाच्या चार ते पाच जवानांनी आग आटोक्यात आणली. या आगीत दहा डिफ्रिज, लाकडी काऊंटर, सोळा लाकडी कपाटे, आईस्क्रीम, चॉकलेट, मायक्रो ओहन, बिसलरी बाटल्या, बिस्कीट, ब्रेड, डिस्प्ले काऊंटर आदी साहीत्य आगीत जळून खाक झाले.घटनेचे वृत्त समजताच शिरवळचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी भेट देवून पाहणी केली.  घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली असून फौजदार श्री खरात तपास करत आहेत.

Tags |: Fire, Bakery, Shirval news