Tue, Jul 23, 2019 19:19होमपेज › Satara › स्थलांतरित मुले आठवड्यात शोधा

स्थलांतरित मुले आठवड्यात शोधा

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:16PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

आजही जिल्ह्यात ठिकठिकाणी  पालकांसोबत स्थलांतरित मुले दिसून येत आहेत. त्यामध्ये कधीही शाळेत न गेलेली, जन्म दाखल्याअभावी शाळेत प्रवेश न मिळालेली, मध्येच शाळा सोडलेली, शिक्षण हमी कार्ड नसलेली मुले आढळून आली आहेत. अशा प्रकारची मुले इतरत्र दिसत असून अशा स्थलांतरित मुलांचा शोध घेण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. 

स्थलांतरित मुलांबाबत 1 ऑक्टोबर 2015 च्या निर्णयानुसार काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून  या मुलांच्या  शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात काम केले आहे.  मोठ्या संख्येने  मुलांचे स्थलांतरण थांबवण्यात यंत्रणेस यशसुध्दा मिळत आहे. परंतु अद्यापही काही जिल्ह्यातून  मुले पालकांसोबत स्थलांतरित होत आहेत. अशी मुलेनिहाय माहिती गटशिक्षणाधिकार्‍यांनी एकत्रित केली आहे.  त्या मुलांना नजीकच्या  नियमीत शाळेत शिक्षण देण्याची  सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्थलांतरित होणार्‍या  मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्याचे निर्देश होते. मात्र, त्याप्रमाणे कार्यवाही झालेली नाही हे स्थलांतरित झालेल्या मुलांच्या प्रवेशाच्या वेळी लक्षात  आले आहे.

स्थलांतरित मुलांचा शोध,  त्यांचे स्थलांतरण रोखणे, रोखण्याचे प्रयत्न केल्यावरही स्थलांतरीत होणार्‍या मुलांना  शिक्षण हमी कार्ड देण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

स्थलांतरण प्रामुख्याने साखर कारखाना परिसर, वीटभट्टी क्षेत्र व  बांधकाम  सुरू असणार्‍या ठिकाणी होते त्या ठिकाणी भेटी देणे, त्या ठिकाणी स्थलांतरित होवून आलेल्या  मुलांचा शोध घेणे व या मुलांची  संपूर्ण पत्यासह  जिल्हा व तालुकानिहाय यादी करणे, स्थलांतरणाच्या ठिकाणापासून  नजीकच्या नियमीत शाळेत या मुलांना दाखल करणे. ज्या जिल्ह्यातून, शाळेतून ही मुले आली आहेत त्या ठिकाणच्या शाळेकडून शिक्षण हमी  पत्रक घेणे अशी कामे आठवड्यात करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकार्‍यांना दिल्या आहेत.