Sat, Mar 23, 2019 01:59होमपेज › Satara › मलकापुरात युवकांच्या दोन गटात मारामारी

मलकापुरात युवकांच्या दोन गटात मारामारी

Published On: Dec 07 2017 1:30AM | Last Updated: Dec 06 2017 10:17PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत मलकापूर ता. कराड येथे शिवछावा चौकात युवकांच्या दोन गटात मारामारी झाली. मंगळवार दि. 5 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे काहीकाळ वाहतूकीची कोंंडी झाली होती. 

मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिवछावा चौकात युवकांचे दोन गट आमने सामने आले. काही कळण्यापूर्वीच त्यांच्यात जोरदार मारामारी सुरू झाली. पंधरा ते वीस मिनिटे राडा करून दोन्ही बाजूचे युवक वाहनामधून पसार झाले. भर रस्त्यातच घडत असलेल्या या प्रकारामुळे सुमारे अर्धा तास वाहतुक विस्कळीत झाली होती. चौकात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमकी हाणामारी कोणाची व कशासाठी झाली? हे कोणालाच कळले नाही. महामार्ग पोलीस चौकीशेजारीच मारामारी होत असताना पोलीस कर्मचारी चौकाकडे फिरकले नाहीत. यावेळी चौकात बघ्यांची गर्दी झाली होती. याबाबत बुधवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंद झाला नव्हता.