Wed, Jun 26, 2019 11:25होमपेज › Satara › राज्यमंत्री पद म्हणजे वारकर्‍यांचा सन्मान

राज्यमंत्री पद म्हणजे वारकर्‍यांचा सन्मान

Published On: Jun 05 2018 1:18AM | Last Updated: Jun 04 2018 9:20PMरेठरे बु : प्रतिनिधी

माझ्यासारख्या सामान्य व्यक्‍तीला दिलेले मंत्रीपद म्हणजे देशातील लाखो भाविकांचाच सन्मान आहे. भविष्यात पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलेला दिसेल. आपली संस्कृती संत साधुंची आहे. लाखो वारकर्‍यांचे श्रद्घास्थान असलेल्या पंढरपुरात लवकरच संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी संत विद्यापीठ स्थापन करणार आहे.असे सांगून ना.डॉ अतुल भोसले यांनी माझ्या जन्मभूमित झालेला हा सन्मान बहुमूल्य आहे. असे भावनिक उद‍्गार त्यांनी काढले.         

शिवनगर ता.कराड येथे य. मो.कृष्णा कारखाना कार्यस्थळावर, डॉ.अतुल भोसले यांना मंत्रीपदाचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल कृष्णा कारखाना व कराड तालुका साखर कामगार संघ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कारखान्याचे व्हा.चेअरमन लिंबाजीराव पाटील,  संचालक धोेंडीराम जाधव, जितेंद्र पाटील,  दयानंद पाटील,  संजय पाटील,  अमोल गुरव,  गिरीष पाटील,  सुजित मोरे, पांडुरंग होनमाने, गुणवंतराव पाटील,  कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी,  संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पवार,  रेठरे सोसायटीचे चेअरमन व्ही. के. मोहिते, पैलवान आनंदराव मोहिते, जि. प. सदस्य राजकुमार पवार, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम.के.कापूरकर,  बाळासाहेब पाटील, मनोज पाटील, माजी संचालक वसंतराव साळुंखे यांची उपस्थिती होती.

ना.डॉ.अतुल भोसले म्हणाले,  मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विश्‍वास दाखवत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीची जबाबदारी  मला दिली. मंदिर समितीच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवत त्यांनी दाखविलेला विश्‍वास मी सार्थ ठरवू शकलो, याचा मला आनंद आहे. भविष्यात पंढरपूरला स्मार्ट देवस्थान बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशिल आहे. 

यावेळी संचालक जितेंद्र पाटील म्हणाले, भाऊ व आप्पासाहेबांचा विचारांचा वारसा व अतुलबाबांच्या कर्तृत्वाने मिळालेले हे राज्यमंत्री पद म्हणजे आपला सन्मान आहे. पंढरपूर देवस्थान इतर देवस्थानांसमोर आदर्श ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्‍त केली.संचालक धोंडीराम जाधव म्हणाले, अतुलबाबांनी या भागात काम करण्यात सुरवात केली. भारतीय जनता पार्टीने या कामाची पोहचपावती म्हणून आमदारकीचे तिकीट दिले. अतुल बाबांनी केलेल्या  समाजहिताचे काम पाहून पक्षाने त्यांना पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष व आता राज्यमंत्रीपद दिले आहे. भाऊ  व आप्पासाहेबांचा लोककल्याणाचा वारसा बाबा समर्थपणे पुढे नेत आहेत.

भाऊंना ज्या प्रमाणे राज्यात 18 वर्षे मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याचप्रमाणे अतुल बाबांना राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळावी, यासाठी त्यांच्या पाठीशी आपण सर्व लोेकांनी ठामपणे उभा रहावे, असे  आवाहन कामगार  अध्यक्ष एम.के.कापूरकर यांनी केले. यावेळी  पै.आनंदराव मोहिते श्रीपती हिवरे, ज्ञानदेव मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास संग्राम पाटील,  हेमंत धर्मे,  एल.एम.पाटील,  राहुल पाटील,  मोहनराव शेटे, श्रीराम राजहंस,  तानाजी पाटील,  सर्जेराव पाटील आदीसह  सभासद,  अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.