Thu, Sep 20, 2018 16:05होमपेज › Satara › शेती पंपाच्या वीजेसाठी शेतकर्‍याचा आत्‍महत्येचा प्रयत्‍न

शेती पंपाच्या वीजेसाठी शेतकर्‍याचा आत्‍महत्येचा प्रयत्‍न

Published On: Apr 11 2018 3:05PM | Last Updated: Apr 11 2018 3:05PMकराड : प्रतिनिधी

शेतीला मिळणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांनी बुधवारी ओगलेवाडी येथील वीज कंपनी कार्यालयाचे दरवाजे बंद करुन अधिकार्‍यांना कोंडले. यावेळी करवडी येथील अमीत डुबल यांनी वीजकंपनी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तणाव निर्माण झाला. या आंदोलनात करवडी, वाघेरी, बोरजाई मळा, मेरवेवाडी येथील शेकडो शेतकरी सहभागी  झाले होते. 

यावेळी शेतकर्‍यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. गेल्या तीन महिन्यांपासून या भागात वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. रात्री केवळ एक ते दीड तास  वीजपुरवठा केला जातो. तोही वारंवार खंडित केला जातो. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून हा संताप बुधवारी व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. 

वडोली निळेश्वर फिडरवरून आज पासून वीज पुरवठा केला जाईल, असे आश्वासन वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता राख यांनी  दिल्यानंतर शेतकरी परतले.

Tags : satara, satara news, karad, farmer, electricity pumps