Sun, Jul 21, 2019 12:01होमपेज › Satara › मजूर मिळत नसल्याने शेतकर्‍यांची कोंडी

मजूर मिळत नसल्याने शेतकर्‍यांची कोंडी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी 

सध्या शेतातील कामाला 200 ते 300 रुपये मजुरी देवूनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. एकीकडे वाढत्या बेकारीच्या नावाने प्रचंड बोंब मारली जात असताना प्रत्यक्षात मात्र श्रमाचे योग्य मूल्य देवूनही मजूर मिळत नसल्याचे विदारक चित्र आहे.  दरम्यान, बागायती तसेच जिरायती शेतीमध्येही यांत्रिक अवजारांचा वापर वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

बागायतीसह जिरायती भागातही मजूर टंचाईची अडचण निर्माण झाली आहे. सध्या विविध पिकांवरील औषध फवारणी, खते घालणे, ऊस लागण अशी अनेक शेतीची कामे जोरावर आहेत. शेतमालाला दर मिळो अथवा न मिळो शेतकरी शेतामध्ये राबतच असतो.  मात्र, मजूरच मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले असून मोठे बागायतदार स्वत:कडची वाहने पाठवून दूरदूरहून मजूर आणत आहेत. मजूर टंचाईमुळे मजुरीसोबत चहा नाश्ताही मजुरांना काही जणांकडून दिला जात आहे.  शेतीतील कामांची धांदल उडाली आहे. मजूर टंचाईमुळे अनेक शेतकरी मजुरीचे दर वाढवून द्यायला तयार आहेत तरीही मजूर मिळत नसल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. 

मजुरांअभावी कामाचा खोळंबा

आंतरमशागतीच्या कामांचा मोठा खोळंबा मजुरांअभावी होत आहे. एकाचवेळी अनेक पिके शेतकरी घेत असतात. पण मजुरांसाठी वणवण फिरण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. बागायती भागात पुरुष मजुरांना 200 ते 300 पर्यंत तर महिला मजुरांना 150 रुपये हजेरी दिली जात आहे. मजूर टंचाईमुळे यात मोठी वाढ झाली आहे.