Sat, Dec 07, 2019 14:11होमपेज › Satara › शॉक बसून शेतकरी ठार

शॉक बसून शेतकरी ठार

Published On: Jul 22 2019 2:01AM | Last Updated: Jul 22 2019 2:01AM
कोरेगाव : प्रतिनिधी 

बोरगाव (टकले) ता. कोरेगाव येथेे वीज वितरण कंपनीची विद्युतवाहक तार ओढ्यातील पाण्यात पडली. त्यामुळे शॉक बसून हणमंत शिवाजी निकम (वय 45) या शेतकर्‍याचा व म्हशीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकर्‍याचा बळी गेल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. 

हणमंत हे रविवारी सकाळी शेतात काम करण्यासाठी गेले होते. जाताना नेहमीप्रमाणे गोठ्यातील दोन्ही म्हशी चरण्यासाठी घेऊन गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास म्हशीला  पाणी पाजून येतो, असे पत्नीला सांगून ते जवळच्या ओढ्याकडे गेले. मात्र, तेथे विद्युत वाहक तार पाण्यात पडली होती. त्यामुळे तेथे वीजप्रवाह सुरू होता. त्याला स्पर्श झाल्याने त्यांचा म्हशीसह जागीच मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच रहिमतपूर पोलिस ठाण्याचे सपोनि घनशाम बल्लाळ, हवालदार आनंद गोसावी, पो. ना. बाळासाहेब भुजबळ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, महावितरण कंपनीचे जे. ई. सोमनाथ शिंदे, वायरमन विजय जाधव हेही घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सुरू असणारा विद्युत पुरवठा बंद केल्याने पुढील अनर्थ टळला.