होमपेज › Satara › सटालेवाडीत शेततळ्यात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू

सटालेवाडीत शेततळ्यात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 11:29PM

बुकमार्क करा

ओझर्डे: वार्ताहर 

सटालेवाडी (ता. वाई) येथे शेततळ्यात तोल जाऊन पडल्याने शेतकर्‍याचा बुडून मृत्यू झाला. 

सटालेवाडी येथील तरुण शेतकरी संदीप लक्ष्मण वाडकर (वय 35) यांची  खिंडाचा माळ हद्दीत स्वत:च्या मालकीची जमीन असून, त्या जमिनीत त्यांचे 20 फूट खोल शेततळे आहे. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी याच शेततळ्यात चांगल्या प्रतीचे मासेही सोडले होते. या माशांना ते दररोज खाद्य टाकण्यासाठी शेततळ्यावर जायचे. शनिवारी सकाळी ते आपल्या दुचाकीवरून ते खाद्य टाकण्यासाठी गेले असता शेततळ्याच्या काठावरून त्यांचा तोल गेल्याने ते घसरून शेततळ्यात कोसळले.

हे ठिकाण निर्जनस्थळी असल्याने त्यांना वाचविण्यासाठी कोणीही आले नाही. त्यांचा यात मृत्यू झाला. शेततळ्याला चौफेर प्लास्टिक पेपर असल्याने वर येण्यासाठी प्रयत्न करत असताना ते पुन्हा पाय घसरून पाण्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती सूर्यकांत वाडकर यांनी वाई पोलिसांना दिली.त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे