Thu, Nov 15, 2018 05:34होमपेज › Satara › राणंद तलावाचा कॅनॉल फुटल्याने शेतकरी अडचणीत

राणंद तलावाचा कॅनॉल फुटल्याने शेतकरी अडचणीत

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:14PMम्हसवड : वार्ताहर

राणंद तलावातून पाणी सोडण्यात येणारा कॅनॉल फुटल्यामुळे रांजणी, माळवाडी हद्दीत पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके सुकून जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून हा कॅनॉल तातडीने दुरस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

राणंद तलावामुळे जाशी, पळशीच्या काळेवस्ती, बिडवेवस्ती या भागात पाणी आले असून परिसरातील ज्वारीच्या पिकाला जीवदान मिळणार आहे. यापूर्वी हे पाणी रांजणी गावातील गोपणेमळा, ढवळेवस्ती तर माळवाडी गावातील जाधववस्तीपर्यंत येत होते.त्यामुळे उन्हाळी पिकांना त्याचा फायदा होत होता. तथापि, सध्या हे पाणी वाहून नेणारा कॅनॉल फुटला आहे. त्यामुळे रांजणी व माळवाडी हद्दीत पाणी सोडण्यात आले नाही. हातातोंडाशी आलेले ज्वारी, गहू व हरभर्‍याचे पिक सुकून जाणार आहे.

लघुपाटबंधारे विभागाने तातडीने उपाययोजना करुन फुटलेला कॅनल दुरुस्त करून घ्यावा व रांजणी गावातील गोफणे मळा, ढवळेवस्ती तर माळवाडी गावातील जाधववस्ती परिसरातील शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी या परिसरातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.