होमपेज › Satara › पांढरवाडीत शेतकर्‍याची गळफासाने आत्महत्या 

पांढरवाडीत शेतकर्‍याची गळफासाने आत्महत्या 

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 11:43PMखटाव : प्रतिनिधी 

पांढरवाडी (ता. खटाव) शेतकरी धनंजय यशवंत भोसले (वय 50) यांनी कर्जबाजारी-पणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कर्ज माफ करावे आणि आ. शशिकांत शिंदेंनी कुटुंबाला आधार द्यावा, असे नमूद केले आहे.

पांढरवाडी येथील शेतकरी धनंजय भोसले यांनी सोसायटी, बँक आणि इतर खासगी कर्ज घेतले होते. शेतातून अपेक्षित उत्पन्‍न न निघाल्याने ते कर्जाची परतफेड करु शकले नाहीत. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत त्यांचे 25 टक्केच कर्ज माफ झाले होते. कर्ज फेडता न आल्याने त्यांनी पड नावाच्या शिवारात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी भोसले यांनी लिहलेल्या चिठ्ठीत मुख्यमंत्र्यांनी सगळे कर्ज माफ करावे, आ. शशिकांत शिंदे यांनी याप्रकरणी लक्ष घालून माझ्या कुटुंबाला आधार द्यावा, असे नमूद केले आहे. भोसले यांच्या पशचात आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा आणि दोन मुली आहेत. या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात रात्री उशीरा करण्यात आली.

 

Tags : satara, Khatav, pandharwadi news, Farmer Suicide,