Sat, Jul 20, 2019 13:32होमपेज › Satara › कराड : नामांकित कबड्डीपटूंच्या उपस्थितीत शोभायात्रा (व्हिडिओ)

कराड : नामांकित कबड्डीपटूंच्या उपस्थितीत शोभायात्रा (व्हिडिओ)

Published On: Dec 01 2017 5:02PM | Last Updated: Dec 01 2017 5:45PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

कराडमध्ये नामांकित खेळाडूंच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये भारतीय महिला संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रे,  प्रो-कबड्डीमध्ये सहभागी झालेले नितीन मदने, सचिन शिंगाडे, स्वप्निल शिंदे, दादासो आव्हाड, निलेश साळुंखे या खेळाडू उपस्थित होते.

लिबर्टी मजूर मंडळ,कराड आणि राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कराडमध्ये ६५  वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी विद्यालयपासून या शोभायात्रेस प्रारंभ झाला. प्रारंभी स्वर्गीय पी. डी. पाटील आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करण्यात आले.  यावेळी अभिलाषा म्हात्रे यांच्यासह  खेळाडूंच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे  प्रज्वलन करण्यात आले.

शिवाजी हायस्कूल पासून सुरू झालेली ही शोभायात्रा  कृष्णा नाका, कन्याशाळा, चावडी चौक, दत्त चौक या मार्गे पुन्हा शिवाजी स्टेडीयमवर नेण्यात आली. या शोभायात्रेत सातारा, बुलढाणा, पालघर, अहमदनगर, औरंगाबाद यासह राज्यातील विविध संघातील सुमारे ५५० खेळाडू सहभागी झाले होते.