Thu, Nov 15, 2018 22:22होमपेज › Satara › वरिष्ठांचा आदेश झाल्यास  सातारा लोकसभा लढू : बाबर 

वरिष्ठांचा आदेश झाल्यास सातारा लोकसभा लढू : बाबर 

Published On: Mar 21 2018 11:22PM | Last Updated: Mar 21 2018 10:55PM 
भुईंज (सातारा) : वार्ताहर

भाजपाच्या वरिष्ठांनी आदेश दिल्यास सातारा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असून त्या वेळीच्या तत्कालीन परिस्थितीनुसार निर्णय घेवू, असे सुतोवाच माजी खासदार गजानन बाबर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भाजपाचे राज्यसभेचे खासदार म्हणुन नारायण राणे यांच्यानंतर लढवय्ये व राज्यभर वाहतूक संघटना, रेशनींग दुकानदार संघटना या माध्यमातून माजी खासदार गजानन बाबर यांचे नाव सर्वच राजकीय जाणकरांच्यातून घेतले जात असताना पत्रकार परिषद घेवून बाबर यांनी त्याला दुजोरा दिला. सहा तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून जिल्हाभरात गजानन बाबर यांनी आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर भाजपाचे वजनदार नेते व महसूल मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अमृत महोत्सवी गौरव सोहळा साजरा करून शक्‍ती प्रदर्शन करणार्‍या गजानन बाबर यांनी आपला राजकीय गणेशा वाई मतदार संघातुन विधान सभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे आगामी काळात वरिष्ठांनी आदेश दिल्यास निवडणूक लढवण्यास आपण तयार राहू, असेही बाबर यांनी स्पष्ट केले. 

Tag : Satara Loksabha, BJP,  Babar, Election