Fri, Jul 19, 2019 07:18होमपेज › Satara › साताऱ्यात एमपीएससी घोटाळा; डमी बसवून बनला सहाय्यक निरीक्षक 

साताऱ्यात एमपीएससी घोटाळा; डमी बसवून बनला सहाय्यक निरीक्षक 

Published On: Mar 23 2018 3:28PM | Last Updated: Mar 23 2018 3:39PMसातारा : प्रतिनिधी

राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) 2016 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेला डमी विद्यार्थी बसवून कर सहाय्यक निरीक्षकपद मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोविंद बळीराम चेंबोले (रा. धाणोर बुद्रुक, ता. उंबरी, जि.बीड) तसेच त्याला मदत करणार्‍या नरसाप्पा शिवहार बिराजदार (रा. किल्लारी, लातुर) या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याची तक्रार राज्य लोकसेवा आयोगाचे उपसचिव सु.ह.अवताडे यांनी दिली आहे.

राज्य लोकसेवा आयोगामार्फत 2016 मध्ये कर सहाय्यक निरीक्षकपदाची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी गोविंद चेंबोले याने अर्ज भरला होता. अर्ज भरल्यानंतर त्याला परीक्षेसाठी नांदेड केंद्र देण्यात आले होते. नांदेड येथील केंद्र गैरसोयीचे असल्याचे कारण सांगत चेंबोले याने साताऱ्यातील आण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे केंद्र विनंतीवरुन घेतले. त्यानुसार 28 जून 2016 रोजी या परीक्षेचा पेपर झाला. चेंबोले हा पेपर स्वत: देण्यासाठी न येता त्याने नरसाप्पा शिवहार बिराजदार याच्या मदतीने डमी विद्यार्थी बसवला.

Tags : Student, Exam, MPSC, Satara News, FIR, Police