Sun, May 26, 2019 19:01होमपेज › Satara › सातारा: माजी आमदार प्रभाकर घार्गेवर फसवणुकीचा गुन्हा

सातारा: माजी आमदार प्रभाकर घार्गेवर फसवणुकीचा गुन्हा

Published On: Jul 18 2018 10:25AM | Last Updated: Jul 18 2018 10:25AMसातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अतुल विजयचंद्र शहा (रा कोडोली, सातारा) यांनी घार्गे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फसवणुकीची ही घटना 2005 ते 17 जुलै 2018 या कालावधीत घडली आहे. घार्गे यांना 2005 साली पैशाची गरज असल्याने तक्रारदार यांना भेटून त्यांचा डुप्लेक्स फ्लॅट विकायचा असल्याचे सांगितले. ठरलेल्या व्यवहारापैकी 2 लाख 10 हजार रुपये दिले. पैसे दिल्यानंतर मात्र, कागदपत्रे तयार करण्यास टाळाटाळ करून नंतर फ्लॅटमधून बाहेर होण्यास सांगून दमदाटी, शिवीगाळ केली. भाडे कराराच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक झाले असल्याचे शहा यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री उशीरा त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.