Sat, Jul 20, 2019 10:36होमपेज › Satara › सातारा : विजय दिवस समारोहात शस्त्र प्रदर्शनास प्रारंभ (व्हिडिओ)

सातारा : विजय दिवस समारोहात शस्त्र प्रदर्शनास प्रारंभ (व्हिडिओ)

Published On: Dec 15 2017 12:33PM | Last Updated: Dec 15 2017 12:33PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

भारतीय सैन्यदलाच्या बांगलादेश मुक्ती संग्रामातील देदिप्यमान विजयाप्रित्यर्थ कराडमध्ये विजय दिवस समारोह समितीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या 20 व्या विजय दिवस समारोहात शुक्रवारी शस्त्र प्रदर्शनास प्रारंभ झाला. 9 एमएम पिस्टल, इनसास रायफल, ऑटोमॅटिक रॉकेट लॉंचर, रॉकेट लॉंचर, मल्टी शॉट ग्रेनेड लॉंचर अशी विविध भारतीय लष्करच्या ताफ्यातील शस्त्रे या प्रदर्शनामुळे विद्यार्थी व नागरिकांची पाहण्यासाठी खुली झाली आहेत.

येथील लिबर्टी मैदानावर या प्रदर्शनाला कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, माजी नगरसेवक अरुण जाधव, निवृत्त कर्नल संभाजी पाटील, शिक्षण मंडळ कराडचे चंद्रशेखर देशपांडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी साडेदहाच्या सुमारास या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व कराडचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन चरित्रावरील छायाचित्रे आणि देशाचे संरक्षणमंत्री तसेच विविध खात्यांचा कार्यभार एक सक्षम मंत्री म्हणून केलेले कार्य छायाचित्रणाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. याशिवाय ‘ऑपरेशन विजय’ तसेच अन्य युद्धप्रसंगी बलिदान दिलेल्या जवानांची स्मृतीही या प्रदर्शनाच्या माध्यमातून जतन करत ती युवा पिढी पुढे मांडण्याचा प्रयत्न विजय दिवस समारोह समितीने केला आहे.