Sun, Nov 18, 2018 19:50होमपेज › Satara › लाखो रुपयांचा महसूलला लावला चुना 

केसुर्डी एमआयडीसीत उत्खनन

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 23 2017 10:58PM

बुकमार्क करा

खंडाळा : वार्ताहर 

खंडाळा तालुक्यातील केसुर्डी एम.आय.डी.सी. मध्ये शासनाचा महसूल बुडवून अनाधिकृत क्रशर चालू आहे. या क्रशरवर कारवाई करण्याची मागणी युवराज ढमाळ यांनी केली आहे. 

खंडाळा तालुक्यातील विशेष औद्योगिक क्षेत्रांतर्गत विविध कंपन्या उभ्या रहात आहेत. या औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत . मात्र या ठिकाणी अनाधिकृत कामे सुरू असून शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाला चुना लावण्याचा गोरखधंदाही सुरू आहे. या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून एक अनाधिकृत क्रशर सुरू असून कोणतीही परवानगी न घेता, रॉयल्टी न भरता शेकडो ब्रास दगडांचे क्रशिंग करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता एसईझेड फेज 1 मधील कंपन्यांच्या उभारणीवेळी निघालेले दगड मुरुम असून ते त्याच क्षेत्रात वापरता येतात. त्या ठिकाणचे रस्ते, खड्डे भरणे व अन्य कामासाठी वापरण्याऐवजी दुसर्‍या ठिकाणच्या रस्त्याच्या कामासाठी वापरले जात आहेत. प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करत, प्रसंगी दबावतंत्राचा वापर करत संबंधित ठेकेदार शासकीय अधिकार्‍यांना अडचणीत आणण्याचे उद्योग खंडाळा तालुक्यात करीत आहेत. शासनाचा महसूल बुडवून, गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणारांविरुद्ध प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.