Sun, Jan 26, 2020 17:59होमपेज › Satara › आम्ही नवदुर्गा

आम्ही नवदुर्गा

Published On: Oct 16 2018 2:00AM | Last Updated: Oct 15 2018 9:12PM21 व्या शतकात वावरत असताना महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहेच. पण अगदी पुराणकाळापासून महिला आत्मनिर्भर राहिल्या आहेत. अनादी काळ, वेद, ग्रंथामध्ये स्त्रीची महती व तिच्या कर्तृत्वाचा उल्‍लेख आढळतो. अगदी महाभारत, रामायणामध्येही महिलांनी केलेला त्याग, समर्पणातून त्यांची त्यागी वृत्ती दिसून आली आहे. राजे महाराजांच्या काळात तर अनेक शूरवीर महाराण्यांनी राणीपण केवळ मिरवण्यासाठी नव्हे तर ते राज्याचे, जनतेचे रक्षण करण्यासाठी असते हे सिध्द करत असताना अनेक लढायांमध्ये सहभाग घेतला आहे. भारताच्या इतिहासाने या महाराण्यांची यशोगाथा अनेकदा गायली आहे. आजही स्त्रिचे कर्तृत्व सांगताना याच स्त्रियांच्या कर्तृत्वाचा दाखला दिला जातो. 21 व्या शतकात पोहोचताना अनेक परिवर्तने झाली असली तरी त्या प्रत्येक परिवर्तनाशी सुंसंगत स्वत:मध्ये बदल करत खंबीरपणे महिला प्रत्येक संकटांना सामोरे जात ‘दुर्गा’ ठरत आहेत. त्या सर्व कर्तृत्ववान महिलांना कोटी-कोटी सलाम!

कष्टाच्या जोरावर यशस्वीीं उद्योजिका बनलेल्या सौ. शुभांगी माने

‘कुटुंब हेच माझे घर, माझे माहेर आणि माझे सासर’ हा मंत्र घेऊन आगाशिवनगर (मलकापूर)च्या नवदुर्गेने प्रचंड कष्टाने सासर्‍यांच्या व्यवसायाची धुरा खांद्यावर घेत कष्टाच्या जोरावर यशस्वी महिला उद्योजिका बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले व ते सत्यात उतरविले. 

सौ. शुभांगी प्र्रताप माने यांचे सासरे अशोकराव माने आकाईवाडी (ता. कराड) येथून आगाशिवनगर येथे स्थायिक झाले. प्रारंभी वखार व्यवसाय  आणि त्यातूनच प्रगती साधत माने कुटुंब हे आगशिवनगरवासिय झाले. समाजकारण करत अशोक माने यांनी 1990 ते 95 या काळात मलकापूर ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लढवली व विजयी पताका फडकवली. हेच समाजकारणाचे बाळकडू सौ. शुभांगीताई आज या विभागात यशस्वीपणे संभाळत आहेत. सौ. शुभांगी माने यांनी स्वतः उद्योजिकता बनायचे ठरवले. त्यासाठी कष्टाची तयारीही ठेवली आणि घरात म्हैशींचा गोठा सर्वांच्या सहकार्याने उभारला. आज याच दूध धंद्यातून त्यांनी आपले सासरे अशोक माने यांचे नावाने अशोक दूध हा ब्रॅण्ड बाजारात आणला. आगाशिवनगर मलकापूरसह परिसरातून दुचाकी गाडी वरून घरोघरी दूध पोहचवतात. तर उर्वरीत दूधापासून पनीर व दूग्धजन्य पदार्थ तयार करून मुंबई पुण्याच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवताय. पतीच्या सहकार्याने त्या या व्यवसायात कार्यरत आहेत. स्वतःचा मोठा डेअरी प्रकल्प असावा अशी त्यांची इच्छा असून आज सासरे हयात नाहीत.पण त्यांचा वसा आणि वारसा त्या यशस्वी पणे सांभाळत आहेत. भविष्यात सासर्‍याचे समाजकारणाचे स्वप्नही त्या सत्यात उतरविण्यासाठी आगामी मलकापूर नगरपालिका निवडणुकीसाठी तयारीत आहेत.  

महिलांना बचतीचा मंत्र देणारी दुर्गा सौ. भारती मिणीयार

पैशांची बचत करून त्याद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करणार्‍या, कुटुंबाचा आर्थिक आधार बनण्याचे प्रशिक्षण देवून  स्वावलंबनाचे धडे देवून सहकारातून समृध्दीचे ज्ञान देणार्‍या येथील महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. भारती सत्यनारायण मिणीयार या महिलांना बचतीचा मंत्र देवून उन्नतीचा मार्ग देणार्‍या खर्‍या अर्थाने दुर्गा ठरल्या आहेत. 

सौ. मिणीयार यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सध्या बँकिंग क्षेत्रामध्ये महिलांची संख्या वेगाने वाढत आहे. घरोघरी जावून बचतीचे महत्व सांगून महिलांना बचतीची सवय लावणार्‍या सौ. मिणीयार यांनी पती सत्यनारायण मिणीयार यांच्या मार्गदर्शनाखाली बँकिंग व्यवसाय सुरू केला. याचबरोबर शिवतेज महिला मंडळाच्या संस्थापक, महाराष्ट्र राज्य महिला उद्योजक परिषद 1999 च्या कार्याध्यक्षा, प. महाराष्ट्र पतसंस्था 1999 च्या संयोजक म्हणून काम पाहिले आहे. तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्या, महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी पतसंस्थांचे फेडरेशनच्या संचालक, महाराष्ट्र राज्य माहेश्‍वरी महिला संघटन कार्यकारीणी सदस्य, चौथ्या उद्योजकीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या संयोजक होत्या.  मर्चट ग्रुपच्या महिला मर्चंट, कराड मचर्ंट, मर्चंट स्वयंरोजगार, मर्चंट प्रतिष्ठान व सुजीवन योगोपचार केंद्रच्या माध्यमातून सौ. मिणीयार कार्यरत आहेत. सध्या महिला मर्चंट पतसंस्थेत 105 कोटी ठेवी असून भागभांडवल 7 कोटी रूपये आहे. 8660 सभासद संख्या आहे. तर कराड मर्चट संस्थेचे भागभांडवल 13 कोटी 81 लाख, ठेवी 311 कोटी 60 लाख, सभासद संख्या 18,750 आहे. कर्जे 210 कोटी 39 लाख आहेत. 

राजकीय क्षेत्रातील धडाडीची दुर्गा सौ. छायाताई शिंदे

राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने पाय रोवून ठामपणे उभ्या राहणार्‍या महिलांमध्ये निगडी ता. कराड येथील सौ. छायाताई शिंदे यांचा आवर्जून उल्‍लेख केला जातो. तर राजकारणापेक्षाही समाजकारणाला जास्त महत्व देवून अनेकांना आर्थिक आधार देणार्‍या त्या खर्‍या अर्थाने दुर्गा ठरल्या आहेत.

बारावी शिक्षण घेवून इलेक्ट्रीशियन्स विषयात आयटीआय करणार्‍या सौ. शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला. सातारा जिल्हा शिवसेनेच्या त्या महिला संघटक आहेत. 

डी.डी. एम. सी. एल. डायरेक्टर या दोन्ही पदाच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक सेवा त्या करीत आहेत. त्यांनी डी. डी. एम. सी. एल. या कंपनीच्या माध्यमातून आज अखेर सुमारे 1 लाख लोकांना रोजगार निर्मिती करून दिली आहे. कराड व पाटण तालुक्यात शिवसेनेच्या 22 महिला शाखा सुरू करून दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एस. टी. ची  सोय करून दिली आहे.  गणेश मंडळातील सदस्यांना 60 हून अधिक टी शर्टचे वाटप केले आहे. 

शिक्षण, समाजकार्याची जपणूक करणार्‍या नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन

पाटण शहराच्या पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा मान सौ. सुषमा बाळासाहेब महाजन यांना मिळाला. कोयना शिक्षण संस्थेमध्ये गेली आठ वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत असणार्‍या सौ. महाजन यांनी बि. एस्सी. बी. एड. चे शिक्षण घेतले आहे. पाटणला एक सुशिक्षित व सुसंस्कृत नगराध्यक्षा म्हणून दोन वर्षांत त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे सार्वजनिक प्रश्‍नांना न्याय मिळाला आहे. मुळातच शिक्षिका त्यामुळे शिस्त व प्रगती यातून ध्येयधोरणे राबविताना त्यांनी पूर्वीची ग्रामपंचायत व त्यांच्या काळात झालेली नगरपंचायत याचा सुरेख संगम साधला आहे. कोणताही राजकीय वारसा अथवा अनुभव नसतानाही त्यांनी निष्कलंक ही जबाबदारी पार पाडत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर तसेच पाटणच्या जनसामान्यांचा विश्‍वास सार्थ केला आहे. राजकारण असो किंवा समाजकारण येथे एकाच वेळी सुशिक्षित आणि सुसंस्कृत याचा मेळ असणे अपवादात्मक असते. मात्र येथे सौ. महाजन यांच्या रूपाने या दोन्ही बाजू पाटणच्या सार्वत्रिक विकासासाठी महत्वपूर्ण ठरल्या आहेत. निश्‍चितच अशा कर्तृत्ववान महिला समाजासमोर येत असल्याचे निश्‍चितच महिला सबलीकरण व राजकारणातही महिलांना समान आरक्षण ही संकल्पना यशस्वी झाल्याचे सौ. महाजन यांच्या कर्तृत्वावरून सिद्ध झाले आहे. एका सर्वसामान्य कुटुंबात राहूनही सौ. महाजन यांनी आपल्यातील शिक्षक तथा गुरू जपला आहे त्याचवेळी नगराध्यक्षा पदाची जबाबदारी सांभाळताना आपली कुटुंब व्यवस्थादेखील तितक्याच जबाबदारीने त्या यशस्वी करताना पहायला मिळत आहे. हा सुवर्ण त्रिकोण त्यांनी योग्यपणे साधला आहे. 

समाजसेवेचा वारसा जपणारी दुर्गा सौ. शामबाला घोडके 

समाजातील उपेक्षित,गरिबांच्यासाठी धावून जाणार्‍यांचे समाजाच्या व्यासपिठावर अनन्यसाधारण महत्व आहे.त्यात रेठरे बु जि.प.गटातील कर्तबगार महिला सौ.शामबाला घोडके यांचे नाव आदरानं घ्यावं लागेल.

नेत्यांनी दाखवलेला विश्‍वास व समाजाची अपेक्षा कशा पुर्ण होतील यासाठी त्यांची सातत्याने,व यशस्वीपणे  सुरू असलेली धडपड व तळमळ वाखाण्याजोगी आहे.जि.प.मतदार संघातील प्रत्येक गाव वाडीवस्ती पर्यत त्यांनी शासनाच्या योजना,उपक्रम पोहचवण्यासाठी केलेले सातत्याने प्रयत्न यामुळे आज शामबाला घोडके यांचे नाव सातत्याने घेतले जात आहे.  महिलांना येणार्‍या समस्या,अडचण व मदत यासाठी त्यांच्याकडे पाहीले जात आहे.हे.कोणतही काम सहजासहजी होत नाही हे अनुभवाने ओळखून असलेल्या शामबाला घोडके आपल्या मतदार संघातील कामे घेवून जि.प.सातारा तसेच मंत्रालयाच्याही पायर्‍या ओलांडत असतात त्या लोकांच्या कामांसाठीच. महिलांसाठी त्या आदर्शवत आहेत.

सभापती पदाला सकारात्मक न्याय देणार्‍या सौ. उज्ज्वला जाधव

महिलांना राजकारणात सक्रिय केल्यानंतर त्याचा समाजकारणावर होणारा सकारात्मक परिणाम आणि यातून सार्वजनिक विकासाबरोबरच महिला सबलीकरण तसेच सक्षमीकरण कसे होते याचा परिपाक म्हणजे पाटण पंचायत समितीच्या सभापती सौ. उज्ज्वला विशाल जाधव. बारावी शिक्षण झालेल्या सौ. जाधव यांना माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंचायत समिती निवडणुकीसाठी संधी दिली. त्यात त्या बहुमताने निवडून आल्या. वास्तविक राजकारणाचा तसा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या सौ. जाधव यांनी जबाबदारीने आपली वाटचाल यशस्वी करून दाखविताना त्यांचेवर टाकलेला सार्वत्रिक विश्‍वास त्यांनी खर्‍या अर्थाने सार्थ करून दाखविला आहे. सभापती पदाच्या काळात मुलभूत नागरी सुविधांमध्ये रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या बाबीत तर त्यांनी लक्ष घातलेच याशिवाय प्रामुख्याने महिला अधिकाधिक सबल कशा होतील यासाठी सकारात्मक उपक्रम, योजना राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. निश्‍चितच मग अगदी शिलाई, पिको फॉल मशीन, घरघंटी, शेळीपालन, यासह शेती औजारे, ताडपत्री, समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबविण्यात आले. निर्मल ग्राम, प्लास्टिक मुक्ती अभियान आदी साठी जनजागृती करण्यातही त्यांचा कार्यकाळ यशस्वी ठरला आहे. याशिवाय प्रशासनालाही शांततेत व समजावून घेत वेळप्रसंगी तितक्याच कठोर बाबींची अंमलबजावणी करण्यामुळे निश्‍चितच पंचायत समिती ही तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठीचे प्रमुख व्यासपीठ असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.

समाजसेवेचा वसा घेतलेल्या सौ. सोफिया कागदी 

पद असो वा नसो समाजकारण ज्यांना करायचे आहे त्यांना पदाची गरज नसते. त्यांच्या कर्तृत्वानेच पद त्यांच्याकडे येते. त्यामुळेच नुकत्याच लायनेस क्लबच्या अध्यक्षपदावर विराजमान झालेल्या सौ. सोफिया नईम कागदी यांनी सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवला आहे. सोफिया कागदी यांचे कर्तृत्व  महिलांसाठी आदर्शवत आहेत. 

पदवीधर शिक्षण असणार्‍या सोफिया लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या स्थापनेपासूनच्या सदस्या म्हणून कराडमध्ये कार्यरत आहेत. लायनेसच्या 2005 मध्ये त्या अध्यक्षा होत्या. त्यानंतर 2018 मध्ये त्यांना पुन्हा त्याच पदावर कार्यरत राहण्याची संधी मिळाली ही गौरवाची बाब आहे.. मुस्लिम समाजातील परंपरा, रूढी, बंधने यांचा योग्य तो आदर राखत आपल्या कर्तृृत्वाची मेढ रोवली आहे. पती सामाजिक कार्यकर्ते नईम कागदी यांच्या सहकार्याने त्यांनी समाज सेवेची धुरा उचलली आहे. लायनेस क्लबच्या माध्यमातून महिलांसाठी  आरोग्य शिबिर, तपासणी तसेच कुमारावस्थेतील मुलींसाठी मार्गदर्शक शिबिरे आयोजित केली आहेत त्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. लायनेस क्लबच्या माध्यमातून सुमारे 15 हजार गोरगरिबांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केली आहे. तसेच मुक बधीरांसाठी आर्थिक आधार मिळावा म्हणून त्यांच्या चित्रांना संस्था, संघटना, हॉस्पिटल आदी ठिकाणी पोहोचवून त्यांच्यासाठी आर्थिक प्राप्‍तीचा मार्ग तयार केला आहे. क्रिडा प्रबोधिनीच्या संचालिका म्हणूनही काम करत आहेत. गुरूवार पेठ, कराड येथील ‘मेमसाब’ या लेडीज रेडिमेड कपड्यांच्या शोरूमच्या त्या संचालिका आहेत. या शॉपमध्ये सर्व प्रकारच्या ब्रँडेड व स्टाईल नुसार, परंपरेनुसार कपडे उपलब्ध आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वी मेमसाबने कराडमध्ये पदार्पण केल्यानंतर महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

ब्युटी वुईथ ब्रेन असणारी अल्फिया मुल्ला

विविध क्षेत्रात नाव उंचावणार्‍यांमध्ये ग्रामीण क्षेत्र पुढे आहे. पण कराडसारख्या निमशहरी विभागातून फेमिना मिस इंडियाच्या सौंदर्य स्पर्धेत राज्यभरातून हजारो महिला स्पर्धकांमधून रेठरे बुद्रुक (ता. कराड) या ग्रामीण भागातील व कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेणारी अल्फिया फैय्याज मुल्ला हिने ग्रामीण भागातही सौंदर्य किती असते हे पहिल्या दहामध्ये धडक मारून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला. सौंदर्य स्पर्धा म्हणजे शहरी विभागाची मक्‍तेदारी असल्याचा भास निर्माण करणार्‍या मेट्रो शहरातील मुलींना अल्फियाना ग्रामीण भागही यात कमी नाही हे दाखवून दिले. कुशाग्र बुद्धीमत्ता, शरीराची ठेवण यांची गरज असते. ही गरज अल्फियाने पूर्ण केली. कृष्णा मेडीकल कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तृतीय वर्षात शिक्षण घेणारी अल्फिया या दुर्गेने कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांना व तिचे आजोबा व आई हे माझे गरु व मार्गदर्शक असल्याचे सांगते. तर ना. डॉ. अतुल भोसले व विनूबाबा भोसले व माझे वडील प्रेरणास्थान आहेत. त्यांच्यामुळेच मी अशा स्पर्धेत जाऊ शकले व यश संपादन करू शकले.

नियमित व्यायाम, योग्य आहार यांसह जनरल नॉलेजचा अभ्यास केला आणि स्पर्धेत सहभागी झाले. राज्यभरातील हजारो सौंदर्य स्पर्धेतील मुलींना मागे टाकत पहिल्या टॉप टेनमध्ये गेले इथेच मी जिंकले. ग्रामीण भागातून येऊनही आपण यामध्ये कोठेच कमी नाही यामुळे आत्मविश्‍वास वाढला. आज राज्यात होणार्‍या स्पर्धेसाठी मला सहभागी होण्यासाठी विचारणा होते. आणि जेव्हा सहभागी होते तेव्हा यश मिळवते. त्यामुळे सौंदर्य स्पर्धेत भरविण्यात आपण आपले नाव कमावू शकतो. हा विश्‍वास मनात ठाम असला आहे. त्यासाठी माझे नातेवाईकासह ग्रामस्थ, मैत्र, मैत्रिणी यांची साथ मोठी आहे.  शिक्षण पूर्ण करत शक्य तितक्या सौंदर्य स्पर्धा जिंकणे हे आपले उद्दीष्ट आहे. त्यासाठी सर्वांचे पाठबळ मिळावे एवढीच माफक अपेक्षा आहे.

समाजकारण आणि राजकारणातील कोहिनूर अ‍ॅड. मनीषा रोटे 

गोरगरीबांच्या विषयी कळवळा असणार्‍या मध्ये अ‍ॅड. मनीषा रोटे यांचे नाव घ्यावे लागेल.अन्यायाविरूध्द तसेच गोरगरिबांच्या प्रश्‍नावरती सडेतोड आवाज उठविण्याचे कार्य त्या अविरतपणे करत आहेत. जनमानसात  ‘माई’या नावाने परिचित असणार्‍या या व्यक्तीमत्वाचा सामाजिक कार्यातील चढता आलेख निश्‍चितच कौतुकास्पद आहे.

समाजकारण करत असताना. राजकारणात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विचारधारा रूचल्याने त्यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा अ‍ॅड. चारूलता टोकस  यांच्या मार्गदर्शनाखाली त्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षात दाखल झाल्या. मनिषा रोटे यांना काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिट