होमपेज › Satara › फलटण पालिका : ‘स्थायी’तून अनुप शहांना डच्चू

फलटण पालिका : ‘स्थायी’तून अनुप शहांना डच्चू

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 8:54PM

बुकमार्क करा
फलटण : प्रतिनिधी

फलटण नगरपालिकेच्या  विषय व स्थायी समितीच्या सभापतींच्या निवडी आज पिठासन अधिकारी तहसीलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. यामध्ये स्थायी समितीच्या सदस्यपदावरून अनुप शहा यांच्या जागी मलठण येथील अभिजित भोसले यांची वर्णी लागली आहे. 

फलटण पालिकेच्या विषय व स्थायी समितीच्या निवडीप्रसंगी नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, उपनागराध्यक्ष नंदकुमार भोईटे, गटनेते रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, गटनेते अशोक जाधव व सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी बांधकाम समितीच्या सभापतीपदी किशोरसिंह नाईक-निंबाळकर, पाणी पुरवठा समितीच्या सभापती सुभद्राराजे नाईक निंबाळकर, आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी सौ. वैशाली अहिवळे, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी सौ. प्रगती कापसे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. ज्योस्ना शिरतोडे व नियोजन समितीच्या सभापती पदी नंदकुमार भोईटे यांच्या बिनविरोध निवडी झाल्या. तथापि, थायी समितीच्या सदस्यपदावरून अनुप शहा यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी मलठण येथील अभिजित भोसले यांची वर्णी लागली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून सत्ताधार्‍यांना घरचा आहेर देणारे अनुप शहा या बदलावर काय भूमिका घेतात ते महत्त्वाचे ठरणार आहे.

या निवडींना शहरात भुयारी गटार योजना तसेच स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या पार्श्‍वभूमीवर महत्व प्राप्त झाले असून सर्व नूतन सभापतींवर मोठी जबाबदारी आली आहे. सर्व पदाधिकार्‍यांचे ना. रामराजे नाईक निंबाळकर, जि. प. अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर, बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे ना.निंबाळकर यांनी अभिनंदन केले.