Wed, Mar 27, 2019 03:59होमपेज › Satara › सातारा : गट शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांना अटक

सातारा : गट शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांना अटक

Published On: May 11 2018 6:54PM | Last Updated: May 11 2018 6:54PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी दहा हजार रुपयांची लाच घेतलेल्‍या प्रकरणातील दुसऱ्या संशयित आरोपी महाबळेश्वरच्या गट शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. पोलिसांनी त्‍यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

 सोमवारी सातारा एसीबीने पुनीता गुरुव यांना दहा हजार रूपयांची लाच घेताना अटक केली. याच प्रकरणात सहभागी असलेल्‍या  गटशिक्षणाधिकारी वंदना वळवी पसार झाल्या होत्या. 

वेतनश्रेणी फरक बिल काढून ते मंजूर करण्यासाठी तक्रारदार शिक्षकाकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव व गट शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार शिक्षकाने सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार केल्यानंतर सोमवारी पुनीता गुरव यांनी शिक्षण विभागाच्या त्यांच्या केबिनमध्ये लाचेचे दहा हजार रुपये घेताना त्‍यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते.