Wed, Mar 27, 2019 03:59होमपेज › Satara › कोयनेत सौम्य भूकंप

कोयनेत सौम्य भूकंप

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:26PMपाटण : प्रतिनिधी

महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोयना धरण परिसरात रविवारी सकाळी भूूकंपाचा सौम्य धक्का बसला.

रविवारी सकाळी 11.36 मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 29.6 किलोमीटर अंतरावर वारणा खोर्‍यातील जावळे गावच्या दक्षिणेला दहा किलोमीटरवर होता. त्याची खोली 14 किलोमीटर इतकी होती.