Sat, Jul 20, 2019 21:23होमपेज › Satara › हल्लाबोल आंदोलनावेळी चोरट्यांचा उच्छाद

हल्लाबोल आंदोलनावेळी चोरट्यांचा उच्छाद

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 10:29PMउंब्रज : प्रतिनिधी

उंब्रज (ता. कराड) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलना दरम्यान चोरट्यांनी अनेकांच्या खिशावर डल्ला मारल्याचे उघडकीस आले. याबाबत उंब्रज पोलिस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दाखल झाली आहे.

सोमवार, 9 एप्रिल रोजी उंब्रज येथे राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन होते. ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या गर्दीत खिसे कापू, चोरटे घुसले व त्यांनी अनेकांच्या खिशावर हात साफ करून घेतला.  सोन्याची चेन, रोख रक्कम, मोबाईल हँडसेट लंपास केले आहेत. याबाबत माजी उपसरपंच सुधीर जाधव यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

सुधीर जाधव यांच्या गळ्यातील  हजार रुपये किमंतीची तीन तोळ्याची  सोन्याची चेन चोरट्यानी लंपास केली आहे.  तसेच संग्रामसिंह पलंगे यांच्या खिशातील वीस हजाराची रोकड, रामभाऊ जाधव यांच्या खिशातील अठरा हजाराची रोकड, उंब्रजचे ग्रामसेवक पवार यांची दहा हजाराची रोकड, तसेच रोकड व काही कार्यकर्त्यांचे मोबाईल चोरीला गेले आहेत.