Fri, Apr 26, 2019 09:47होमपेज › Satara › भूमिगत विद्युत वाहिनीमुळे शहराच्या सौंदर्यात भर : रामराजे नाईक-निंबाळकर 

भूमिगत विद्युत वाहिनीमुळे शहराच्या सौंदर्यात भर : रामराजे नाईक-निंबाळकर 

Published On: Feb 24 2018 1:12AM | Last Updated: Feb 23 2018 11:37PMफलटण : प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शहराच्या विकासासाठी प्रयत्न केला असून यापुढेही शहरासह शेजारील भागाचाही विचार करून विकासाचा वेग वाढवणार आहे. फलटण शहरातील भूमिगत विद्युत वाहिनीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे प्रतिपादन ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. फलटण शहरात केंद्र सरकारच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत भुमिगत विद्युत वाहिनी कामाचा शुभारंभ ना. रामराजे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

ना. रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले,  शहर स्मार्ट सिटीकडे जात असताना लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. भुयारी गटारामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्‍न मिटणार आहे. तसेच भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. त्यामुळे हे काम व 15 दिवसात सुरू होणार्‍या भुयारी गटार योजनेच्या कामात काही अडचण निर्माण होऊ नये, याची काळजी नगरपालिका व ठेकेदारांनी घ्यावी.

नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे यांनी प्रस्ताविकात या कामासाठी 3.44 कोटी मंजूर झाले असून योजनेतून 132  केव्ही कोळकी उपकेंद्र  ते पृथ्वी चौक, पृथ्वी चौक ते नारळी बाग, दत्त मंदिर ते गोसावी वस्ती, गोसावी वस्ती ते जिंती नाका असा 13.47 किमी भूमिगत विद्युत वाहिनीचे काम होणार असल्याचे सांगितले. मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, संदीप मेनसे, अशोक मेनसे, मिलिंद नेवसे, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.