Mon, Mar 25, 2019 03:15
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › वरातीत डॉल्बी वाजवल्याच्या कारणावरुन २० हजारांचा दंड 

वरातीत डॉल्बी वाजवल्याच्या कारणावरुन २० हजारांचा दंड 

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 10:24PMखंडाळा : वार्ताहर

कोल्हापूर परिक्षेत्रात डॉल्बीला बंदी असतानाही पारगाव, ता. खंडाळा येथे विनापरवाना रात्री उशिरापर्यंत डॉल्बीचा दणदणाट सुरु असल्याने खंडाळा पोलिसांनी कारवाई केली. शुक्रवारी न्यायालयाने डॉल्बी चालकास 20 हजार रुपये दंड ठोठावला. 

याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री पारगाव येथे एका विवाहानिमित्त नवरदेवाची मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत रात्री साडेसातपासून साडेदहा वाजेपर्यंत सारोळा ता. भोर येथील सुरज डिजिटल डॉल्बीचा दणदणाट  सुरू होता. कर्णकर्कश आवाजामुळे पारगाव - खंडाळा येथील नागरिकांनी खंडाळा पोलीसांकडे दूरध्वनीवरून तक्रारी केल्या.

खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज हांडे यांनी तातडीने याची दखल  घेत पोलीस पथकाला घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी डॉल्बी बंद करून डॉल्बी चालक गजानन धाडवे (सारोळा) याच्यावर गुन्हा दाखल केला. शुक्रवारी खंडाळा न्यायालयाने  वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला. या घटनेने डॉल्बीचालकांना चांगली चपराक मिळाली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.