Wed, Aug 21, 2019 01:54होमपेज › Satara › दारू पिऊन एस.टी. चालवली; चालकावर गुन्हा दाखल

दारू पिऊन एस.टी. चालवली; चालकावर गुन्हा दाखल

Published On: Jan 14 2018 10:21AM | Last Updated: Jan 14 2018 10:21AM

बुकमार्क करा
वाई : प्रतिनिधी
वाई आगारात ड्युटी नसतानाही दारु पिऊन एस.टी. चालवून दोन वाहनांचे 50 हजाराचे नुकसान केल्याप्रकरणी चालक नितीन बापूराव पिसाळ रा. बावधन याच्याविरुद्ध वाई पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चालक नितीन पिसाळ हे दि. 13 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वा. वाई आगारातील एस.टी. क्र एमएच 07 सी 9563 ड्युटी नसताना दारु पिवून चालवू लागले.

यात त्यांनी उभ्या असलेल्या एमएच 20 डी 9063 ला धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत वाहन परिक्षक अरुण अर्जुन शिर्के यांनी फिर्याद दिली असून महिला पो.ना. माने तपास करीत आहेत.