Fri, Apr 26, 2019 15:47होमपेज › Satara › डॉ. पाटणकरांचे राजकारण हानिकारक

डॉ. पाटणकरांचे राजकारण हानिकारक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सणबूर : वार्ताहर

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला मिळालेले यश प्रकल्पग्रस्तांचेच आहे. धरणग्रस्त असो वा प्रकल्पग्रस्त यांचे धोरणात्मक निर्णय लोकप्रतिनिधीच घेत असतात.प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन पक्षविरहीत होते तर मग डॉ. पाटणकरांनी राष्ट्रवादी पक्षाच्या लोकांचेच शिष्टमंडळ बैठकीला कशाकरीता सोबत आणले होते? असा सवाल शिवसेना पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला आहे. 

कोयना विभागातील शिवसेना पदाधिकारीउपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, अशोकराव पाटील, तालुका प्रमुख रवींद्र पाटील,हरीष भोमकर,धोंडीराम भोमकर यांनी याबाबतचे पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. 
पत्रकात म्हंटले आहे की, कोयना प्रकल्पग्रस्तांनी पक्षविरहीत आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला.आ.शंभूराज देसाई त्यांना या बैठकीचे रितसर निमंत्रण होते. कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन जसे पक्षविरहीत होते तशी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नासंदर्भात मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेली बैठकही पक्षविरहीतच होणे गरजेचे होते. मात्र श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ.पाटणकर यांनी इतर कोणत्याही पक्षाच्या लोकांना या बैठकीकरीता बरोबर न आणता केवळ राष्ट्रवादी पक्षाच्याच लोकांचे शिष्टमंडळ बैठकीला बरोबर नेल्यामुळे या बैठकीला ख-या अर्थाने पक्षाचा आणि गटबाजीच्या राजकारणाचा वास देण्याचा प्रयत्न केला. 

तालुक्याचे लोकप्रतिनिधी आ. देसाई यांनी या बैठकीत कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न तातडीने सुटावेत असेच मुद्दे या बैठकीत मांडले आणि ते मुख्यमंत्री यांच्याही लक्षात आले.यात त्यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांविषयी श्रेय किंवा उसने प्रेम दाखविण्याचा विषयच नव्हता. श्रमिक मुक्ती दलाच्या नेत्यांचे गटबाजीचे राजकारण कोयना प्रकल्पग्रस्तांना हानीकारक असून याचा प्रत्यय पाटण तालुक्यातील इतर प्रकल्पग्रस्तांनी अनेकदा घेतला आहे. 

Tags : Satara, Satara News,  Dr.Patankar, politics, harmful, Koyna project


  •