होमपेज › Satara › डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 14 2018 10:37PMकराड : प्रतिनिधी 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती शनिवारी  कराड शहर परिसरात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. शहराबरोबर ग्रामीण भागातही जयंतीचा जल्लोेष होता. दरम्यान शासकीय व निमशासकीय कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. शनिवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्यावतीने पूर्ण कराड शहरातून रॅली काढण्यात आली. राष्ट्रीय सेवा संघ यांच्यावतीने डॉ. आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. 

सिक्‍कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, जि.प. सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील, सनबिम इन्फोटेकचे सारंग पाटील, नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मनसेचे जिल्हाध्यक्ष विकास पवार, सागर बर्गे, दादा शिंगण, मंगळवार पेठेतील सर्व मुस्लिम बांधव, नाभिक समाजाचे भानुदान वास्के, मराठा महासंघाचे बाळासाहेब पवार, राहूल चव्हाण, कराड तालुक्यातून सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शुक्रवारी रात्री पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार राजेंद्र शेळके, पो. नि. प्रमोद जाधव, विहार थोरवडे यांनी ध्वजारोहण केले. याठिकाणी वंदना घेण्यात आली. यावेळी व्ही. आर. थोरवडे, संतोष थोरवडे, शरद गाडे, राहुल भोसले, राकेश थोरवडे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी बहुजन विचारवंत सर्वजित बनसोडे, संभाजी ब्रिगेडचे डॉ. विकास पाटील यांचे व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी डॉ. आंबेडकर यांनी सर्व समाजातील वंचित घटकांच्या उध्दारासाठी  मोलाचे कार्य केले. न्याय, स्वातंत्र, समता व बंधूता याचा अंगिकार करून सर्वांना न्याय हक्काची जाणीव करून दिली.

हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांना न्याय, हक्क आणि कायद्याचे संरक्षण मिळवून दिले. डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा वारसा पुढे सुरू राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे सांगितले. जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महिलांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर भजन केले. दुपारी आंबेडकर चौकामध्ये जयंतीनिमित्त लाडू  वाटप, सरबत वाटप करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या रॅलीत  मानाच्या घोड्यासह महिला व पुरूष मोठ्या संख्येने सहभागी होते. शहरात अभिवादन रॅली काढण्यात आली. रॅलीत महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाहू चौकातून रॅलीस प्रारंभ झाला. तेथून दत्त चौकातून बसस्थानकाच्या मुख्य रस्त्याने रॅली उपजिल्हा रूग्णालय मार्गे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत गेली. त्यानंतर महामानवास अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. आभार भिमसेना जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी मानले. दरम्यान कराड शहरासह तालुक्यातील सर्व गावात डॉ. आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

Tags : Satara, Dr Babasaheb Ambedkar, Jayanti,  excited