Wed, May 27, 2020 09:00होमपेज › Satara › प्रामाणिक काम करूनही शंका-कुशंका

प्रामाणिक काम करूनही शंका-कुशंका

Published On: Jul 27 2019 1:32AM | Last Updated: Jul 26 2019 11:40PM
कण्हेर : वार्ताहर

लोकसभेला प्रामाणिक कामे करून देखील आमच्यावर आरोप केले जात आहेत. सातारा विधानसभा मतदारसंघाने लोकसभेला 42 हजारांहून अधिक मताधिक्य दिले आहे. तरी आमच्याबद्दल नाराजगी दिसत आहे. पक्षात असून देखील जे पक्षाविरुद्ध काम करत आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. परंतु आमच्याबद्दल शंका कुशंका घेऊन आरोप केले जात आहेत, अशी खंत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली. 

वर्ये, ता. सातारा येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपसभापती जितेंद्र सावंत, जि. प. सदस्य प्रतिक कदम, सदस्या सौ. सरिता इंदलकर, अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत,ज्येष्ठ नेते शिवराम घोरपडे, सुरेश टिळेकर, सरपंच विशाल ननवरे, सुरेश टिळेकर आदी प्रमुख उपस्थित होते.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा तालुक्यातील लिंब, शेंद्रे, परळी आदी गटातून लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीला 25 हजाराचे मताधिक्य दिले आहे. परंतु जावलीत माथाडींची संख्या जास्त असल्याने तेथील मतदान विभागले आहे. पक्षासाठी लोकसभेला प्रामाणिकपणे काम करूनदेखील आमच्याबद्दल शंका कुशंका घेऊन आरोप केले जात आहेत. आजपर्यंत आपण कधीच वाईटाला थारा दिला नाही, तर चांगुलपणाची पाठराखण करण्यात हयगय केली नाही.सर्वसामान्य जनताही आपल्या पाठीशी असून ती माझ्या संपर्कात आहे.विकासाला प्राधान्य देऊन जनतेचा विश्वास राखला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 

जितेंद्र सावंत म्हणाले, बाबाराजे यांच्या माध्यमातून गटागटात अनेक विकासकामे झाली आहेत. त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन, ते जनतेत नेहमीच मिसळत असल्याने त्यांना व्यापक पाठिंबा मिळत आहे. 

यावेळी उपसरपंच सौ.अनिता निकम, प्रज्ञा माने, नथूशेठ निकम, युवराज पठारे, दीपक चिंचकर, प्रवीण ननावरे, बबन निकम, विनोद शिंदे, अमोल गोगावले, धर्मेंद्र सावंत आदी उपस्थित होते. प्रस्ताविक इंद्रजीत ढेंबरे यांनी केले. आभार हनुमान जगताप यांनी मानले.