Thu, Jun 27, 2019 17:47होमपेज › Satara › जुळ्या बहिणींना दहावीत 'सेम' गुण

जुळ्या बहिणींना दहावीत 'सेम' गुण

Published On: Jun 08 2018 9:02PM | Last Updated: Jun 08 2018 9:02PMसातारा: प्रतिनिधी

मानवी जीवनातील जुळ्यां माणसांचे अनेक प्रसंग सांगितले जातात. त्यावर विश्वास ठेवणे बहुतेक वेळी कठीण असते. अशीच एक घटना साताऱ्यात पाहायला मिळाली. शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये एसएससी बोर्डात दोन जुळ्या बहिणींना जुळे गुण मिळाल्याचे तुम्ही कधी ऐकलेय का? सातारा शहरातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात शिकणार्‍या जुळ्या बहिणींना इयत्ता दहावीच्या परीक्षेत जुळे म्हणजेच 90.20टक्के गुण मिळाले आहेत. 

सिद्धी आणि रिद्धी नितीन शिंगटे अशी या जुळ्या बहिणींची नांवे आहेत. या दोघीही पहिलीपासून सोबतच शिक्षण घेत आहेत. सातारा येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयातून त्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. या दोघींनाही दहावीच्या परीक्षेत समान  गुण म्हणजे ९०.२० टक्के गुण मिळाले. या दोघींचे वडील हे वकील असून आई गृहिणी आहेत. अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात प्रवेशावेळी एकीला लकी ड्राद्वारे प्रवेश मिळाला. पण जुळ्या बहिणी असतील तर दुसऱ्याही बहिणीला प्रवेश दिला जातो असा नियम आहे. त्यामुळेच या बहिणी एकाच शाळेत शिकल्या.