Wed, Apr 24, 2019 19:29होमपेज › Satara › पक्के वैरी झाले सख्खे दोस्त

पक्के वैरी झाले सख्खे दोस्त

Published On: May 29 2018 1:30AM | Last Updated: May 28 2018 7:53PMरेठरे बुद्रूक : दिलीप धर्मे

कुत्रे व मांजर यांचे वैर सर्वश्रृत आहेच. मात्र, रेठरे बुद्रुक येथील हेमंत धर्मे यांच्या घरातील कुत्रा व मांजर एकमेकांचे पक्के मित्र बनले आहेत. घराला कुलूप लावून मालक जेव्हा बाहेरगावी गेल्याचे दिसताच प्रामाणिक कुत्रा आपल्या मनीम्याऊला चक्‍क कुशीत घेऊन आधार देण्याचा प्रयत्न करतो. मुके प्राणी एकमेकांशी समजावून घेत आहेत, मात्र, माणूस म्हणून आपण का एकमेकांना समजून घेत नाही, असा प्रश्‍न पडतो. 

बहुतांशी वेळा कुत्रे व मांजर एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागत असतात. अनेकवेळा एका घरात राहून एकमेकांचे वैरी बनून राहत असतात. यांच्या वैरपणाच्या अनेक गोष्टी सर्वांनी ऐकल्या आणि पाहिल्या आहेत.  

मात्र, हेमंत धर्मे यांच्या घरातील हे वैरी एकमेकांचे अगदी जिवलग दोस्त आहेत. त्यांची दोस्ती पाहून दोस्ती असावी तर अशी असे पाहणारे म्हणतात. कितीही भांडले, रागावले, एकमेकांच्या अंगावर गुरकावून धावून गेले तरी आपणाला एकाच घरात रहायचे आहे जणू हेच ओळखून कुत्र्याने घरातील सर्वजण बाहेरगावी गेल्यावर मांजरास मायेची उब देऊ केली आहे. एकमेकांना असे जवळ करत ‘तेरी मेरी यारी’चे दर्शन घडविले. त्यांच्या या दोस्तीची चर्चा ग्रामस्थ कौतुकाने करत असतात. खरे तर माणसांनीही यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे.