Tue, Apr 23, 2019 06:31होमपेज › Satara › डॉक्टर महिलेला मारहाण

डॉक्टर महिलेला मारहाण

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 22 2018 10:43PMसातारा : प्रतिनिधी

डॉक्टर महिलेस एका महिलेनेच काठीने मारहाण केल्याची घटना सातार्‍यातील शुक्रवार पेठेत घडली. वर्दळीच्या ठिकाणी दोन महिलांमधील मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार डॉ. दीपाली निकम या सध्या समर्थ हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्या आर्यांग्ल हॉस्पिटलसमोरील रस्त्यावरून दुचाकीने निघाल्या होत्या. संशयित अभिनेत्री खंडागळे या महिलेने तक्रारदार डॉक्टर महिलेची दुचाकी रस्त्यामध्ये अडवली. ‘तू तुझ्या नवर्‍याला सोडून जा, आमचा कोर्टात दावा सुरू आहे,’ असे म्हणत हातातील काठीने डॉक्टर महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. या सर्व घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. याचवेळी संशयित महिलेसोबत असणार्‍या व्यक्तीने डॉक्टर महिलेची दुचाकी पाडून गाडीचे नुकसान केले असल्याचे डॉ. दिपाली निकम यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, तक्रारदार डॉक्टर मारहाणीत जखमी झाल्या असून प्राथमिक उपचार सिव्हील हॉस्पिटल येथे केल्यानंतर पुढील उपचार खासगी रुग्णालयात सुरु आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केवळ अभिनेत्री खंडागळे हिचे नाव तक्रारीत घेतले असून गाडीचे नुकसान केलेल्या संशयिताचे नाव सांगूनही त्याचा तक्रारीत अनोळखी असा उल्लेख केला आहे. यामुळे पोलिसांनी  योग्य ती कारवाई न केल्यास दि. 26 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा डॉक्टर महिलेने दिला आहे.

 

Tags : satara, satara news, Doctor woman, Hitting,