होमपेज › Satara › पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करु नका

पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करु नका

Published On: Mar 18 2018 1:05AM | Last Updated: Mar 17 2018 10:55PMदहिवडी : प्रतिनिधी

आपण मायभूमीला भारतमाता म्हणतो पण अमेरिकेला तिथं मावशीपण सुद्धा म्हणत नाहीत. आपल्या देशाची संस्कृती महिला-मुलींनी ती जपली अन टिकवली पाहिजे. त्यांच्या संस्कृतीचे अंधानुकरण करु नका, असे आवाहन समाजसेविका डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केले.

दहिवडी, ता. माण येथे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतुन रयत संकुल, माणदेश फाउंडेशन, ड्रीम फाउंडेशन, पुणे यांच्या विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षा अनुराधा देशमुख, तहसीलदार सुरेखा माने, जि. प. सदस्या डॉ. भारती पोळ, सोनाली पोळ, नगराध्यक्षा साधना गुंडगे, म्हसवडच्या उपनगराध्यक्षा स्नेहल सुर्यवंशी, प्रा.कविता म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सपकाळ म्हणाल्या, आई-वडील लाडक्या मुलीला चांगले शिक्षण, कपडे, मोबाईल घेऊन देतात चांगला खर्च करतात. त्यामुळे सासरी जाताना आई-बाबांच्या डोळ्यांतून पाणी येऊ देऊ नका. यावेळी डॉ. सिंधुताईंच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला तसेच आदर्श मातांचा गौरव करण्यात आला. प्रभाकर देशमुख, रमेश पाटोळे, डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ, आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

Tags : Satara, Dahiwadi, Dahiwadi News, Culture, Western Culture, Sindhutai Sapkal,